PANVEL MINOR GIRL ALLEGED SEXUAL ASSAULT IN PUBLIC TOILET; POLICE REGISTER CASE AND BEGIN INVESTIGATION Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

Panvel Crime News : पनवेलच्या वाल्मिकी नगर परिसरात सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • पनवेलच्या वाल्मिकी नगर परिसरात अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात लैंगिक अत्याचार

  • पीडितेच्या कुटुंबीयांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला

  • पोलिसांनी तपास सुरू केला

विकास मिरगणे, पनवेल

Panvel Walmiki Nagar Rape Case Crime News पनवेलमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. शहरातील वाल्मिकी नगर परिसरात सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या घटनेने मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिकी नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर पीडित मुलीने घडलेला सगळा प्रकार कुटुंबियांना सांगितला. मुलीने सांगितलेली आपबिती ऐकून कुटुंबीयांचा संताप झाला. कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला अटक करण्यासाठी आणि घटनेशी संबंधित सर्व पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. या घटनेनंतर महिला आणि लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षितता, विशेषतः शौचालये, मोकळे परिसर आणि कमी वर्दळीची ठिकाणे याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. वाल्मिकी नगर परिसरातील रहिवाशांनी संवेदनशील भागांमध्ये नियमित पोलीस गस्त वाढवावी, अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि महिला सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पनवेल शहर पोलीस करत असून, तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Frequently Headache Problem: तुम्हालाही सतत डोकेदुखीचा त्रास आहे का? जाणून घ्या यामागची छुपी कारणे आणि घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

SCROLL FOR NEXT