Panvel accident video Saam Tv
मुंबई/पुणे

Panvel Accident : पनवेलमध्ये एसटी बसला मोठा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटले अन् बस झाडावर आदळली; पाहा थरारक VIDEO

Accident News : पनवेलच्या कोनगावाच्या फाट्याजवळ एका एसटी बसचा अपघात झाला. चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस रस्त्याजवळच्या एका मोठ्या झाडावर आदळली. दरम्यान हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.

Yash Shirke

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पनवेलमध्ये एका एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. या अपघातामध्ये एसटी बसच्या पुढच्या भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्यातील कोन गावाच्या फाट्याजवळ एसटी बसचा मोठा अपघात झाला आहे. ही एसटी बस शेडुंगहून पनवेलला जात होती. या दरम्यान बसचालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले. एसटी बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या झाडावर जाऊन आदळली आणि उलटली.

दरम्यान रस्त्याजवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा अपघात कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये एसटी बस वेगाने रस्त्याच्या कडेला येत असल्याचे दिसते. ही बस रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळल्याचेही व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. बस झाडावर इतक्या जोरात धडकली, की झाड आणि त्याच्या आसपास असलेल्या गोष्टीचे नुकसान झाले.

बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने ही एसटी बस झाडावर आदळली. अपघातामध्ये बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बसमधील ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पनवेल तालुका पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchami Tithi: शरद ऋतु, पंचमी तिथि आणि चंद्र मिथुन राशीत; या राशींना मिळणार प्रोत्साहन व नवा प्रवास

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Rashmika Mandanna: 'विजयसोबत लग्न करणार...'; अखेर रश्मिकाने कबूल केलंच, तो व्हिडिओ व्हायरल अन् चर्चांना उधाण

Maharashtra politics : राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Shocking : महाराष्ट्र हादरला! मुलाने केली वडिलांची हत्या, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT