Dirty Panipuri Video सिद्धेश म्हात्रे
मुंबई/पुणे

Video: पाणीपुरीचा ठेला रेल्वेच्या शौचालयात! नवी मुंबईतील किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद

Dirty Panipuri Video: या पाणीपुरीमुळे नागरिकांना अनेक आजार उद्भवू शकतात ज्यामध्ये पोटात दुखणे, उलट्या, जुलाब आणि शरीरावर खाज सुटणे यांचा समावेश होतो.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Dirty Panipuri Video: नवी मुंबईतील वाशीमधून एक किळसवाणा प्रकार समोर येतोय. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाच्या शौचालयामध्ये पाणीपुरीचा स्टॉल ठेवलेला आढळला आहे. रेल्वेच्या सार्वजनिक शौचालयात ठेवलेल्या याच पाणीपुरीच्या ठेल्यातून दररोज शेकडो खवय्ये पाणीपूरी खात होते. हा किळसवाणा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. (Navi Mumbai Latest News)

21 व्या शतकातील स्मार्ट सिटी आणि स्वच्छ शहर म्हणून परिचित असलेल्या नवी मुंबई शहरात चक्क सार्वजनिक मुतारीत पाणीपुरीचा (Panipuri) ठेला ठेवला असल्याचा व्हिडिओ (Video) मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या ठेल्यावरील पाणीपुरी खाणाऱ्याचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. कारण या पाणीपुरीमुळे नागरिकांना अनेक आजार उद्भवू शकतात ज्यामध्ये पोटात दुखणे, उलट्या, जुलाब आणि शरीरावर खाज सुटणे यांचा समावेश होतो. (Latest Marathi News)

पाहा व्हिडिओ -

शौचालयात पाणीपुरीचा ठेला ठेवणं अतिशय निषेधार्ह तर आहे, मात्र महानगरपालिकेकडून होणाऱ्या कारवाईपासून वाचण्यासाठी देखील अनेक फेरीवाले असे कृत्य करतात. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना मनपाने लायसन्स उपलब्ध करुन द्यावे जेणे करुन अशा घटनांवर आळा बसेल अशी प्रतिक्रिया खाजामिया पटेल या समाजसेवकाने व्यक्त केली आहे.

एकूणच अस्वच्छ ठिकाणी खाद्यपदार्थ ठेवणे, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणे अशा घटना वारंवार समोर येत असून यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. नागरिकांनीही याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT