Family Dispute Saam Tv News
मुंबई/पुणे

Shocking News: कारण क्षुल्लक, नवरा बायकोमधला वाद टोकाला; आधी खूप झोडलं, नंतर बायकोला दगडानं ठेचलं

Husband kills wife over minor dispute: क्षुल्लक कारणावरून नवरा बायकोमध्ये भांडण झालं. दोघांमधील वाद टोकाला गेला. नवऱ्यानं बायकोची दगडानं ठेचून हत्याच केली.

Bhagyashree Kamble

क्षुल्लक कारणावरून नवऱ्यानं बायकोची दगडानं ठेचून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना पालघर येथील कासा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या थेरोंडे येथे घडली आहे. १० मार्चला रात्रीच्या सुमारास नवरा बायकोमध्ये भांडण झालं. भांडणाचं रूपांतर हाणामारीत झालं. नंतर नवऱ्यानं बायकोला दगडानं ठेचून तिची हत्या केली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला अटक केली आहे.

पालघरच्या कासा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या थेरोंडे येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. आरोपी पती सुरेश भोईर यानं बायकोची दगडानं ठेचून हत्या केली आहे. यात पत्नी (वय वर्ष ५२) गुलाब सुरेश भोईर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. किरकोळ वादातून ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

आधी दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. नंतर भांडणाला सुरूवात झाली. वाद टोकाला गेला. नंतर रागाच्या भरात आरोपी सुरेश भोईर यानं पत्नीची दगडानं ठेचून हत्या केली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं.

तसेच आरोपीविरोधात ३०२ कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, कासा ठाण्यातील पोलीस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ढगांच्या गडगटासह मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT