Schools Closed In Palghar Saam Tv
मुंबई/पुणे

School Holiday: शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, पालघर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

Schools Closed In Palghar: पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आज हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली.

Priya More
  • पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

  • पावसामुळे शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर

  • हवामान खात्याकडून जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी

  • जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन

पालघर जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट असला तरी सकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज पावसाचा सलग चौथ्या दिवशी पालघर जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आजही पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन हवामान खात्याने दिला आहे.

सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण ५३.८४ टक्क्यांनी भरलं असून धरण क्षेत्रात दिवसभरात ३९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत १६२३ मिमी पाऊस धरण क्षेत्रात पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसडून वाहत आहेत. सूर्या नदीतला मोठ्या प्रमाणात पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. अत्यावश्यकता असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

सलग ४ दिवसांपासून पालघरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सूर्या प्रकल्पाच धामणी धरण ५४ टक्क्यांनी भरलं धामणी धरणात दिवसभरात ३९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. सूर्या नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाआहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhajani Thalipeeth Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा खमंग भाजणीचे थालिपीठ, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: चंद्रपूरला रेड अलर्टचा इशारा, जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये उद्या बंद

देशाचे नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींवर राहुल गांधींचे गंभीर आरोप; प्रियांकांच्या वक्तव्यावरही गदारोळ, नेमकं कारण काय?

Mumbai Crime : मुंबईत अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी आणि तृतीयपंथींवर MIDC पोलिसांचा छापा

Zenith Waterfall Rescue: रेस्क्यू ऑपरेशनचा थरार; झेनिथ धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT