Palghar News Saam Tv
मुंबई/पुणे

Palghar News: मन सुन्न करणारी घटना! रचलेल्या सरणावरचा मृतदेह पुराच्या पाण्यात गेला वाहून

Palghar Rain News: मन सुन्न करणारी घटना! रचलेल्या सरणावरचा मृतदेह पुराच्या पाण्यात गेला वाहून

साम टिव्ही ब्युरो

Palghar News: गेल्या तीन ते चार दिवसांपासून पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे नदी नाले ओसांडून वाहत आहे. यातच एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याची बातमी समोर येत आहे. येथे अंत्यसंस्कारासाठी चितेवर रचलेला मृतदेह पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे.

ही घटना पालघर जिल्ह्यातील डुकले पाडा येथे घडल्याची माहिती मिळत आहे. मयत विष्णु शेलार यांचा मृत्यू झाला आहे. अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह चितेवर रचलेला असताना अचानक पूर आला आणि मृतदेह वाहून गेल्याची घटना घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विष्णु शेलार यांच्यावर हात नदीजवळ अंत्यसंस्कार केले जात होते. याच नदीला अचानक पूर आल्याने त्यांचा मृतदेह वाहून गेला. यानंतर नागरिकांनी आपला संपताप व्यक्त केला आहे. पाड्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आजही स्मशानभूमी नाही, अशी खंतही स्थानिकांनी बोलून दाखवली आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास 75 हजार हेक्टर वर भात शेती केली जाते. भातरोपणीच्या कामांचा वेग जो आहे तो वाढलेला होता. मात्र कालपासून झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण जमीन पाण्याखाली गेल्याने भात शेतीचे संपूर्ण पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अजूनही 50%भात रोपनी बाकी असून परलेल भात पाण्यात गेल्याने काहींचं भात कुजल तर काहींचं भात पुरत वाहून गेल्याने बळीराजा मोठ्या चिंतेत सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पत्नीला खाऊ घातले ब्लेडचे तुकडे, पतीला न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलाच्या आलिशान कारची दुचाकीला धडक; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Itchy ears after bathing: आंघोळीनंतर तुमच्याही कानात सतत खाज येते? दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांनी सांगितलं कारण

Home Cleaning Tips: दिवाळीसाठी घराची साफसफाई करायची आहे? मग, वेळ आणि मेहनत वाचवणाऱ्या ७ सोप्या टिप्स नकी फॉलो करा

SCROLL FOR NEXT