palghar citizens morcha on thursday at azad maidan mumbai to oppose vadhavan port project saam tv
मुंबई/पुणे

Vadhavan Port : वाढवण बंदर विरोधात गुरुवारी आझाद मैदानावर आक्रोश माेर्चा

Palghar latest news : शुक्रवारी वाढवण बंदर विराेधी संघर्ष समितीसह मच्छिमार यांनी पालघरला एकत्र येत हुतात्मा चौक येथे वाढवण बंदराची प्रतिकृतीची दहन केले.

रुपेश पाटील

Palghar News :

पालघर जिल्ह्यातील हाेऊ घातलेल्या वाढवण बंदर विरोधात पालघर मधील 25 पेक्षा अधिक संघटना येत्या 22 फेब्रुवारीला आझाद मैदानावर आक्रोश मोर्चा काढणार आहेत. याबाबतची माहिती वाढवण बंदर विरोधी युवा समितीचे मिलिंद राऊत यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदराचे भूमिपूजन याच महिन्यात होणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. त्यानंतर पालघर मधील वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीसह मच्छीमार संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शुक्रवारी वाढवण बंदर विराेधी संघर्ष समितीसह मच्छिमार यांनी पालघरला एकत्र येत हुतात्मा चौक येथे वाढवण बंदराची प्रतिकृतीची दहन केले. यावेळी आंदाेलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबराेबरच सीपीएमकडून डहाणूत सागर नाका येथे रास्ता रोको आंदाेलन करण्यात आले. माकपाचे आमदार विनोद निकोले यांच्यासह कार्यकर्त्यांना डहाणू पोलिसांनी ताब्यात घेतले हाेते.

गुरुवारी आझाद मैदानावर माेर्चा

येत्या गुरुवारी (ता.22) वाढवण बंदर विरोधात आझाद मैदानावर आक्राेश माेर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील मच्छीमारांच्या विविध संघटना आणि पालघर मधील 25 पेक्षा अधिक संघटना सहभागी हाेणार आहेत अशी माहिती मिलिंद राऊत यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT