Kirit Somaiya  Saam Tv
मुंबई/पुणे

दापोलीतील रिसॉर्ट अनिल परबांचे; किरीट सोमय्यांचा दावा

दापोलीतील रिसॉर्ट बेनामी संपत्ती असल्याची जाहीर करण्याची मागणी सोमय्या यांनी केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना (Shivsena) नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या निवासस्थानासह ७ ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. आज सकाळी ६ वाजेदरम्यान, ईडीचे पथक (ED Raids) अनिल परबांच्या घरी पोहचलं, तेव्हापासून ही कारवाई सुरू आहे. या पथकात जवळपास ४ अधिकारी असल्याची माहिती आहे. दरम्यान या छाप्यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरु आहेत, भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. दापोलीतील हे रिसॉर्ट अनिल परब यांचेच असल्याचे आता समोर आले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

दापोलीतील रिसॉर्ट अनिल परब यांचेच आहे, हे आजच्या धाडीत समोर आले आहे. या रिसॉर्ट मधील लाईटचे मीटर हे अनिल परब (Anil Parab) यांच्या नावावर आहे. यांची ही संपत्ती बेनामी असल्याची जाहीर करण्याची मागणी मी केलेली आहे, काळा पैसा दापोलीतील गुंतवला आहे, असा आरोप किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल परब यांच्यावर केला आहे.

बेनामी प्रॉपर्टी अंतर्गत अनिल परब (Anil Parab) यांच्यावर कारवाई केली पाहिजे. या रिसॉर्टसाठी काळ्या पैशाचा वापर केला. पर्यावरण मंत्रालयाने यावर कारवाई सुरु केली आहे. मागिल महिन्यात दापोली पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या (Police) बदल्यांचा पैसा या रिसॉर्टमध्ये गुंतवला आहे, असंही सोमय्या म्हणाले. २ मे २०१७ ला १ कोटी १० लाखात ही जमीन विकत घेतली. ही जागा घेताना सीआरझेड होत माहित होते. समुद्राच्या बाजूला असल्याने नियमाने एनए होत नाही. तरीही यांनी सरकारचा दबाव वापरुन एनए करुन घेतले आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी, सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली आहे.

पोलिसांच्या बदलीचा पैसा रिसॉर्टसाठी वापरला

देशात १०० टक्के लॉकडाऊन होता तेव्हा अनिल परब दापोलीत रिसॉर्ट बांधत होते. मला खात्री आहे अनिल परब यांच्यावर कारवाई होणार आहे, असंही सोमय्या म्हणाले. क्राईम मनीचा वापर या रिसॉर्टसाठी झाला आहे. पोलिसांच्या बदलीचा पैसा गोळा केला आहे, तो पैसा या रिसॉर्टसाठी लावला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, असंही सोमय्या म्हणाले. परब यांना अटक होणार हे नक्की असल्याचे सोमय्या (Kirit Somaiy) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Tv Exit Poll: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे बंधूंचा जोर कमी पडला? कुणाची सत्ता येणार? पाहा एक्झिट पोल

मुंबईत भाजपचा महापौर बसणार? महायुती मॅजिक फिगरच्या पार, पाहा एक्झिट पोल, VIDEO

Jalgaon Municipal Election Exit Poll: खान्देशातील सर्वात मोठ्या महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?

Municipal Elections Voting Live updates: वेळेत मतदान केंद्रावर येऊनही मतदान करण्यास नकार, कोल्हापुरात तरुणींचा संताप

अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटील गड राखणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर

SCROLL FOR NEXT