Vikram Gokhale SaamTV
मुंबई/पुणे

2014 पासूनच सामान्य भारतीयाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या वक्तव्यावरती मी ठाम; विक्रम गोखलेंच स्पष्टीकरणं

'गार्डियन पेपर (Guardian Paper) वाचा 18 मे 2014 चा सगळ्यांनी वाचा तेच कंगना (Kangana) बोलली माझ्याकडे त्याची कॉपी आहे त्यामुळे कंगना काही चुकीचं बोलली नाही.'

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) देशाला 1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक मागून मिळालं होतं. तसेत खरं स्वातंत्र्य हे 2014 मध्ये मिळालं असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं तिच्या या वक्तव्यावरती अनेक जणांनी आक्षेप घेत तिच्यावरती टीका केल्या. मात्र मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंनी (Vikram Gokhale) मात्र कंगनाच्या वक्तव्याशी आपण सहमत असल्याचं म्हटलं आणि त्यामुळे अनेकांनी गोखलेंवरती देखील टीका केली होती. या सर्व पार्श्वभूमीवरती आपली बाजू स्पष्टपणे मांडण्याकरिता आज गोखलेंनी पत्रकार परिषद (Press conference) घेतली होती त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवरती भाष्य केलं.

हे देखील पहा -

ते म्हणाले 'माझी बाजू ऐकून घ्यायला तुम्हाला जाग आली तुम्ही आलात मी बोलणार, फक्त मी कोणाच्या संदर्भहीन प्रश्नाला उत्तर देणार नाही. विक्रम गोखले विरोधक आणि समर्थक यात गदारोळ सुरू आहे. माझ्या बाजूने मला संपवायचा आहे. ज्या विवादित मुद्यावर हा चालू आहे त्यावर मी बोलणार; विक्रम गोखले मी काय बोलतोय हे मी पण रेकॉर्डिंग करतोय.'

'माझ्या 76 व्या वाढदिवशी जे भाषण झालं ते मूळ दाखवलं नाही भंपक प्रश्न विचारून माझं टाळलं फिरवणारे तुम्ही कंगना राणावत या मुलीची इतर भाषणे आहेत ती तिची वैयक्तिक मतं भारतीय स्वातंत्र्य (Indian independence) बाबत वक्तव्याला तिची कारणं असू शकतात त्याला मी दुजोरा दिला. त्यालाही माझी स्वतः ची कारणे असू शकतात त्या मुलीची माझी ओळख नाही. आम्ही काम केलं नाही कोणीतरी काही बोलल्याची दखल घेण्याबाबत मत व्यक्त करणे हा माझा अधिकार आहे. माझी राजकीय अभ्यासाशी चांगली ओळख आहे. मी दुजोरा दिला त्याला माझीही कारणे असल्याचं गोखले म्हणाले.

कंगना चुकीचं बोलली नाही -

दरम्यान गार्डियन पेपर वाचा 18 मे 2014 चा सगळ्यांनी वाचा तेच कंगना बोलली माझ्याकडे त्याची कॉपी आहे त्यामुळे कंगना काही चुकीचं बोलली नाही असं मी म्हणालो; '2014 पासून माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला स्वतंत्र मिळालं हे मत मी बदलणार नाही.' त्यामुळे ज्यांना मी काय बोललो आहे मूळ भाषणात जे तुम्ही दाखवलं नाही. मी कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकांचा (Freedom Fighter) अपमान केला नाही. 2014 नंतर माझा भारत जागतिक पटलावर भक्कम उभा राहिला असल्याचही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT