पुणे । महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश

पुण्याच्या न्यायालयाचे आदेश

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे, अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अमोल कविटकर, अश्विनी जाधव केदारी

पुणे : पुण्याचे भाजपचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या विरोधात कोर्टाने अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. मोहोळ यांना सार्वजनिक स्वच्छतागृहाचं प्रकरण महागात पडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शौचालय ठेकेदार असलेल्या भाचाच्या मदतीने तोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. कोथरूडमधील भीमनगर भागातील नागरिकांनी ही जागा सोडून जावे यासाठी महापौरांनी हे शौचालय तोडलं आहे.

पहा व्हिडीओ-

मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या पत्नी जवळपास 20 वर्षांपासून नगरसेवक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या वार्डमधील हा प्रकार आहे. भीमनगरच्या नागरिकांना त्या ठिकाणाहून स्थलांतर करायला लावून, त्या ठिकाणी एखादा गृहप्रकल्प सुरू करण्याचा मोहोळ यांचा प्लॅन असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

त्यामुळे या नागरिकांनी या प्रकरणात कोर्टामध्ये धाव घेत याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने मोहोळ यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. तर या प्रकरणात अनेक तांत्रिक बाबी अंतर्भूत आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू करावा, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. तसेच यासंदर्भात एका महिन्यात तपासाचे निष्कर्ष समोर आणणार असेही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Control Fruits: नियमित ही ५ फळे खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्यावर यवतमाळच्या महागांव पोलिसात गुन्हा दाखल

IB Recruitment: इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरीची संधी, पगार १,४२,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Period Pain Relief: मासिक पाळीच्या वेळी 'या' ड्रायफ्रूटचे सेवन करा, वेदना होतील कमी

Panchang Today: वाचा आजचे पंचांग 15 जुलै 2025; तिथीनुसार केव्हा आहे शुभ योग? 2 राशींना आज होणार लाभ

SCROLL FOR NEXT