Gate-Marine Drive Tunnel Project News Saam Tv
मुंबई/पुणे

Orange Gate-Marine Drive: ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह अंतर काही मिनिटांत गाठता येणार! कसा असेल हा भुयारी मार्ग; वाचा...

Latest Mumbai Gate-Marine Drive Tunnel Project News Updates: ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देण्यात येणार असून, यासाठी एमएमआरडीए ला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यतेचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Satish Kengar

Mumbai News: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. यासाठी एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यतेचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडली.

प्रकल्पला किती येणार खर्च?

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प ९ हजार १५८ कोटी रुपयांचा असून, राज्य शासनाच्या करासाठी ६१४ कोटी ४४ लाख रुपये, केंद्राच्या कराच्या पन्नास टक्के रकमेसाठी ३०७ कोटी २२ लाख रुपये, भुसंपादनासाठी ४३३ कोटी असे एकूण १ हजार ३५४ कोटी ६६ लाख रुपये बिनव्याजी दुय्यम कर्ज म्हणून उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.

कसा असेल भुयारी मार्ग?

हा प्रकल्प 6.52 किलोमीटरच्या दुहेरी बोगद्यांसह 9.2 किलोमीटरचे अंतर कव्हर करेल. प्रत्येक बोगदा 11 मीटर रुंद असेल, ज्यामध्ये दोन लेन रहदारीसाठी असतील आणि तिसरी लेन आपत्कालीन वापरासाठी असेल. या प्रकल्पाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या भुयारी मार्गामुळे कोस्टल रोड आणि पूर्व द्रुतगती मार्ग थेट जोडला जाणार आहे. ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर पुणे, नवी मुंबई, ठाण्याहून मुंबईत येणाऱ्या वाहनांना कोणत्याही वाहतूक कोंडीचा सामना न करता सहज दक्षिण मुंबईत जाता येईल. तसेच याचे काम पूर्ण झाल्यावर दक्षिण मुंबईतून जाणारी वाहने थेट ट्रान्सहार्बर लिंकला जोडली जातील.

ठाणे ते बोरीवली भुयारी मार्गासाठी (Thane to Borivali Tunnel Project ) १८ हजार ८०० कोटींचा प्रकल्प

दरम्यान, ठाणे ते बोरीवली या भुयारी मार्गासाठी १८ हजार ८०० कोटी ४० लाख रुपयांच्या प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या सहा पदरी मार्गाच्या दुहेरी-भुयारी मार्गाचे बांधकाम प्रतिपदरी भुयारी मार्गाची एकूण ११. ८५ किमी अशी असून, एकूण १८ हजार ८३८ कोटी ४० लाख अशा किंमतीच्या प्रकल्पाची एमएमआरडीए मार्फत अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT