पुणे, ठाणे, रायगडला ऑरेंज तर 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
पुणे, ठाणे, रायगडला ऑरेंज तर 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट Saam Tv
मुंबई/पुणे

पुणे, ठाणे, रायगडला ऑरेंज तर 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - महाराष्ट्रात सांगली Sangli, कोल्हापूर Kolhapur, सातारा Satara आणि पुणे Pune या जिल्ह्यांमध्ये पावसाची Rain जोरदार बॅटिंग सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे दरड Land Slide कोसळण्याच्या अनेक घटना गेल्या २४ तासात घडल्या आहेत.

रज्यातील विविध ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मदत कार्यात एनडीआरएफ आणि लष्करातर्फे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, पुढील चार दिवस महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात येत आहे.

हे देखील पहा -

तसेच पुणे, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर दुसरीकडे सातारा आणि रत्नगिरीमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. राज्यात काल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टी झाली आणि यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात पावसाच्या जोरदार सरी पडल्याचे पहायला मिळत आहे. तर मराठवाड्यात मुसळधार पावसाची नोंद झाली.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा घाट विभागात अतिवृष्टीचा तर चंद्रपूर, यवतमाळ, पालघर ठाणे आदी परिसरात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला होता. त्यामुळे येत्या बुधवारपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडेल. तर महाराष्ट्र किनारपट्टी लगत सोसाट्याचे वारे वाहतील अशी माहिती देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spruha Joshi : स्पृहा जोशीचं बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण, 'या' वेबसीरीजमध्ये साकारली प्रमुख भूमिका

Narayan Rane : सत्ता गेल्याने त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय; नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

MI vs KKR, Toss Prediction: टॉस ठरेल बॉस! KKR ला हरवण्यासाठी मुंबईने आधी काय करावं?

Today's Marathi News Live : राहुल गांधी यांच्या पुण्यातील सभेच्या वेळेत बदल, सभास्थळी ६.३० वाजता येणार

Share Market Today : शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १४०० अंकानी घसरला, झटक्यात गुंतवणूकदारांचे ३ कोटी बुडाले

SCROLL FOR NEXT