Devenra Fadnavis And Ajit pawar  saam tv
मुंबई/पुणे

देवेंद्र फडणवीस तेव्हा पुन्हा येईन म्हणाले, पण उद्धव ठाकरे आले; अजित पवारांचा हल्लाबोल

'देवेंद्र फडणवीस तेव्हा पुन्हा येईन म्हणाले होते, पण नंतर उद्धव ठाकरे आले. सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेले नाही, अशा शब्दात अजित पवारांनी (Ajit Pawar) सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Ajit Pawar News : आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे, गेले चार दिवस वादळी ठरले. आजच्या पाचव्या दिवशी सत्ताधारी-विरोधकांमध्ये विधानसभेच्या पायरीवर जोरदार राडा पाहायला मिळाला. त्यानंतर विधीमंडळातील वातावरण चांगलंच पेटलं आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधीमंडळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. 'देवेंद्र फडणवीस तेव्हा पुन्हा येईन म्हणाले होते, पण नंतर उद्धव ठाकरे आले. सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेले नाही, अशा शब्दात अजित पवारांनी (Ajit Pawar) सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

अजित पवारांनी राज्यातील विविध प्रश्नावरून शिंदे सरकारला चांगलेच धारेवर धरलं. अजित पवार म्हणाले,'राज्यातील जनता महागाईचा सामना करत आहे. लोकांवर चुली बंद करायची वेळ आली आहे. पेन्सिलवर जीएसटी लागल्याने मुलं सरकारकडे बघत आहेत. तसेच अल्पवयीन मुलांच्या कायद्यात देखील बदल करायला हवा. ते बालसुधारगृहात सरळ सांगतात की, एकाची हत्या करून आलो आहे. राज्यात सायबर गुन्हे देखील वाढले आहे'.

अजित पवारांनी आर्यन खान प्रकरणावर देखील भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, 'मधल्या काही काळात आर्यन खान प्रकरण झाले. त्यात एका तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाला नाहक त्रास झाला'. तर सत्ताधाऱ्यांवर टीका करताना अजित पवार म्हणाले, 'सत्ता आल्यानंतर आनंद होणे हे स्वाभाविक आहे. त्यात दुमत नाही. देवेंद्र फडणवीस तेव्हा म्हणाले होते की, मी पुन्हा येईन. पण नंतर उद्धव ठाकरे आले. सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेले नाही. सत्तारूढ आमदार जाहीरपणे चिथावणी देतात. कशाची मस्ती एवढी आली आहे ? दुसऱ्या एका आमदाराने अधिकाऱ्यांच्या कानाखाली मारली. त्यांच्या कृत्याने संदेश असा जातो की, सर्वच असे वागतात की काय ?'.

दरम्यान, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर देखील भाष्य अजित पवारांनी केलं. अजित पवार म्हणाले, 'एकाही महिलेला मंत्रिमंडळात घेतले नाही ही लाजिरवाणी बाब आहे. ठीक आहे, तुमच्याकडे जागा आहेत. याबाबत तुम्ही विचार कराल. आम्हाला सर्व माहित आहे की, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते नाणेही हल्ली दुसरी बाजू दाखवत नाही. फडणवीस, आधी म्हणाले होते की, सरकारच्या बाहेर राहून काम करणार. पण लगेच नंतर उपमुख्यमंत्री झाला. तेव्हाच सांगायचे ना मी उपमुख्यमंत्री होणार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माहिममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर; ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

SCROLL FOR NEXT