रश्मी पुराणिक
मुंबई: गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. बाप्पा येणार म्हटल्यानंतर सर्वत्र आनंदाला उधाण आलं आहे. या आनंदात आता आणखी भर पडली आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वीच बाप्पा पावला आहे. गणपती आगमनापूर्वीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पगार आणि निवृत्ती वेतन मिळणार आहे.
गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घराघरांत उत्साह आहे. खरेदीची लगबग सुरू आहे. बाप्पा येणार असल्याने त्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. विघ्नहर्ता बाप्पा येणार असल्यानं सर्वत्र आनंदाला उधाण आलं आहे. त्यात आता बाप्पा आनंदवार्ताही घेऊन आला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Employee) गणेशोत्सवापूर्वीच पगार आणि निवृत्ती वेतन मिळणार आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील पगार गणेशोत्सवाआधीच मिळणार आहे. याबाबत सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचा पगार २९ ऑगस्ट रोजीच संबधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.