Opposition Meeting  Saam TV
मुंबई/पुणे

INDIA Mumbai Meeting : 'इंडिया'च्या मुंबईतील बैठकीचं कसं असेल नियोजन? ५ समित्यांकडे असणार महत्त्वाची जबाबदारी

Political News : येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला ही बैठक होणार आहे.

Rashmi Puranik

Mumbai News : देशातील विरोधी पक्षांची आघाडी INDIAची तिसरी बैठक मुंबईत पार पडणार आहे. येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला ही बैठक होणार आहे. त्याआधी बैठकीची जोरदार तयारीही सुरू आहे.

इंडियाच्या बैठकीसाठी महविकास आघाडीच्या पाच समित्या बनवण्यात येणार आहेत. या समितीत प्रत्येक पक्षातील दोन ते तीन सदस्य असणार आहेत. त्यानुसार या समित्या त्यानुसार समन्वय साधणार आहेत.  (Latest Marathi News)

कोणत्या समिती काय काम पाहणार?

प्रोटोकॉल समिती

दुसऱ्या राज्यातून येणारे मुख्यमंत्री, मंत्री ,पक्ष प्रमुख यांचे स्वागत आणि निरोप देण्याचं काम ही समिती पाहिल.नेत्यांचे विमानतळ ते हॉटेलपर्यंत योग्य व्यवस्था करण्यासाठी ही समिती असेल.

फूड समिती

दोन दिवस बैठकीसाठी लंच, डिनर, नाश्ता, चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. येणारे नेते, त्यांचे सहकारी स्टाफ व्यवस्था ही करण्याचं काम ही समिती करणार आहे. (Political News)

स्वागत समिती

जे मुख्यमंत्री, मंत्री पक्षाचे प्रमुख येणार त्यांचे बैठकीच्या ठिकाणी स्वागत आणि निरोप याची जबाबदारी या समितीवर असेल. (Maharashtra News)

Accomodation समिती

बाहेरच्या राज्यातून येणारे मुख्यमंत्री, मंत्री , नेते त्यांचा स्टाफ याच्या राहण्याची व्यवस्था , त्यांना वाहन उपलब्ध करून देणे हे पाहण्यासाठी ही समिती असेल.

मीडिया समिती

बैठकीसाठी येणाऱ्या प्रसार माध्यमांचे नियोजन करण्यासाठी ही समिती नेमण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Puri Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा मेथीची कुरकुरीत पुरी, सोपी आहे रेसिपी

Municipal Elections Voting Live updates : नवी मुंबई तुर्भेतील मतदारांचा संताप; संपूर्ण नवी मुंबईतील सर्वात खराब मतदान यंत्रणा तुर्भेलाच?

Municipal Elections: अकोल्यात नुसता राडा! मतदान केंद्रावर भाजप आणि शिवसेना आमनेसामने, केंद्राबाहेर फ्री स्टाईल हाणामारी

Saam TV Exit Poll : तुमच्या महापालिकेत कुणाची सत्ता? थोड्याच वेळात पाहा महा एक्झिट पोल, EXCLUSIVE

बोगस आणि तोतया मतदारांवर थेट गुन्हा दाखल होणार! राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचा कडक इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT