Shalini Thackeray On Shinde Group Saam Tv
मुंबई/पुणे

MNS News: मनसेमुळे शिंदे गटाचा एकमेव खासदार मुंबईत निवडून आला, शालिनी ठाकरे यांचं वक्तव्य

Satish Kengar

संजय गडदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा केव्हाही जाहीर होऊ शकता. अशातच सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. मनसेकडून देखील विधानसभा लढवण्याची तयारी सुरू झाली आहे. यातच वर्सोवा विधानसभेतून मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असतानाच कार्यकर्त्यांकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण विधानसभेत मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आले कार्यकर्त्यांकडून आज भावी आमदार म्हणून केक देखील कापण्यात आला.

यावरच आपली प्रतिक्रिया देताना शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत की, ''कार्यकर्त्यांचा आणि मनसैनिकांचा प्रेम आहे, यांची इच्छा आहे ते व्यक्त करतात. शेवटी काय तो निर्णय राज साहेबांचा असतो.''

मनसेमुळे शिंदे गटाचा एकमेव खासदार मनसेमुळे निवडून आला

शालिनी ठाकरे म्हणाल्या की, आम्हाला फक्त एवढेच म्हणायचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नाने उत्तर पश्चिम मध्ये खासदार निवडून आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे सहकार्य केले, त्यामुळे त्यांचे बळ वाढलं ते निवडून आले.''

त्या पुढे म्हणाल्या की, ''आता कुठेतरी त्यांनी पण विचार करायचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कसा न्याय मिळवून द्यायचा. वर्सोवा विधानसभेत सांगायचं तर चांगला कुठलातरी चेहरा नाहीये, महिला चेहरा आता जो आहे, त्या विद्यमान आमदार आहेत. त्याबद्दल खूप नाराजी आहे, हे सगळे मान्य करतात मग राजसाहेब त्या दृष्टीने विचार करत आहेत. राज साहेबांचा जो काही आदेश असेल, तो आम्हाला मान्य असेल.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alum Termeric Benefits: हळद-तुरटीचा फेस पॅक वापरा, पिंपल्सच्या समस्या होतील दूर...

Maharashtra Politics: भाजपला दे धक्का! हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी; आणखी धक्के बसणार, शरद पवारांचा महायुतीला इशारा

Naxalists killed in Chhattisgarh : नक्षलवादी-पोलिसांमध्ये धुमश्चक्री! 30 नक्षल्यांचा सुपडासाफ, VIDEO

Maharashtra News Live Updates: शरद पवार यांच्या उपस्थित होणार हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा नवा पत्ता, थाटलं नवं कार्यालय, छत्रपती भवनातून चालणार जरांगेंचा कारभार

SCROLL FOR NEXT