Pune Dam Water Storage Saam TV
मुंबई/पुणे

Pune Water Storage News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा!, जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ८० टक्के पाणीसाठा शिल्लक

Pune Latest News : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये मिळून सध्या १५८.६६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News :

पावसाळा संपून काही दिवसच उलटत नाहीत तोच पुणेकरांची पाण्याची चिंता वाढली आहे. कारण पुणे जिल्ह्यातील धरणांतील पाणीपातळी मागील वर्षीच्या तुलनेत बरीच कमी आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्यातील नागरिकांना पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो.

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्याच्या घडीला ८० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये मिळून सध्या १५८.६६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठी तब्बल २२ टक्के कमी आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुणे जिल्ह्यातील २६ धरणांपैकी नाझरे हे धरण अद्यापही कोरडे आहे. गेल्या वर्षी यावेळी उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण हे १०२ टक्के इतके होते. पुणे जिल्ह्यात एकूण ३२ धरणे आहेत. यापैकी सहा धरणे ही टाटा समूहाची आहेत.

पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून आज अखेरपर्यंत २६.५९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांचा यामध्ये समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT