रोहिदास गाडगे, साम टीव्ही
कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून झालेल्या महामोर्चात अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र आंदोलन संपल्यानंतर कारवाईचा बडगा शेतकऱ्यांवरच उगारण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देविदत्त निकम यांच्यासह २५० आंदोलकांवर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी मंचर येथे झालेल्या महामोर्चात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार निलेश लंके, माजी आमदार अतुल बेनके,आमदार बाबाजी काळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. हजारो शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते.आंदोलनादरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर रास्तारोको झाल्याचा ठपका ठेवत मंचर पोलिसांनी देवदत्त निकम यांच्यासह सात जण आणि २०० ते २५० आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे आंदोलनाच्या व्यासपीठावर अनेक बडे नेते उपस्थित असताना कारवाईची झळ मात्र, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनाच बसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कांदा उत्पादकांच्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने आता हा प्रश्न अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमीतकमी 25 रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळावा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान कांदा उत्पादकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी, या मागणीसाठी मंगळवारी (दि. 2) पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील भोरवाडी-तांबडेमळा (ता.आंबेगाव) येथील नंदी चौकात शेतकरी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी संतप्त शेकऱ्यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.