Onion Price Saam tv
मुंबई/पुणे

Pune : कांद्याने बळीराजाला रडवलं! प्रति किलो विकला फक्त १ रुपयात, चहा-पाण्यालाही पैसे उरले नाहीत

onion price in Pune market today : पुण्यात कांद्याचे दर कोसळले असून एका शेतकऱ्याला प्रति किलो अवघा १.७८ रुपये दर मिळाला. ७०० किलो कांदा विकूनही हातात चहा-पाण्यालाही पैसे न उरल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे.

Namdeo Kumbhar

रोहिदास घाडगे, मावळ प्रतिनिधी

onion price crash Pune News : शेतकर्‍याच्या घामाला बाजारात किंमत उरली नसल्याचं विदारक चित्र पुण्याच्या गुलटेकडी बाजार समितीत पाहायला मिळालं. खेड तालुक्यातील एका शेतकऱ्याने ७०० किलो कांदा विक्रीसाठी आणला, पण त्याला अवघा १ रुपया ७८ पैसे प्रति किलो इतका सरासरी दर (Average Rate) मिळाला. एकूण विक्रीतून ट्रान्सपोर्ट (Transport) आणि इतर सर्व खर्च वजा जाता या शेतकऱ्याच्या हातात चहा-पाण्यालाही पैसे शिल्लक राहिले नाहीत. वाढता प्रॉडक्शन कॉस्ट (Production Cost) आणि लॉजिस्टिकचा (Logistics) खर्च यामुळे शेतकरी आता "शेती करायची तरी कशी?" असा संतप्त सवाल विचारत आहे.

पुण्याच्या गुलटेकडी बाजार समितीत शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळणाऱ्या रिटर्न्सचा (Returns) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथील एका शेतकऱ्याने १४ बॅग्समध्ये (Bags) भरलेला सुमारे ७०० किलो कांदा सेलसाठी (Sale) पाठवला होता. या कन्साईनमेंटला (Consignment) एकूण १२५० रुपये इतका दर मिळाला; मात्र मार्केट कमिटीचे चार्जेस (Charges), ट्रान्सपोर्टेशन आणि इतर खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या हाती अवघे १८५ रुपये उरले आहेत.

onion price in Pune market today

एकीकडे शेतीचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असताना, बाजारात मिळणारा भाव मात्र सातत्याने घसरत आहे. वाहतूक खर्च, हमाली, तोलाई आणि अडत (कमिशन) यांसारख्या विविध खर्चांमुळे शेतकऱ्याच्या नफ्यावर मोठा डल्ला मारला जात आहे. ७०० किलो कांद्याच्या विक्रीतून जेमतेम १८५ रुपये शिल्लक राहणे, ही बाब शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीचे विदारक दर्शन घडवणारी आहे.

शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य भाव मिळण्याऐवजी त्यांच्या घामाचे कवडीमोल होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. आता तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला मातीमोल किंमत आल्याने शेती करायची की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ७०० किलो कांदा विकून शेतकऱ्याच्या हाती चहा-पाण्यालाही पैसे उरले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT