Pune Crime
Pune Crime अश्विनी जाधव-केदारी
मुंबई/पुणे

एकतर्फी प्रेमातून तरुणाने दहावीच्या वर्गात घुसून मुलीवर केले वार...(पहा Video)

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

प्राची कुलकर्णी

पुणे: पुण्यातील वडगाव शेरी येथील इनामदार शाळेत इयत्ता दहावीच्‍या विद्यार्थिनीवर (student) एका माथेफिरू तरुणाने वर्गात घुसून चाकूने (knife) सपासप वार केले आहेत. यात इयत्ता दहावीमध्ये शिकणारी मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. शाळेत (school) घुसून वर्गात जाऊन एका विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पहा व्हिडिओ-

सकाळी 11 वाजता ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सुरू होता, आरोपी तरुण हातात चाकू घेऊन विद्यार्थिनीच्या दहावीच्या वर्गात घुसला. आरोपीने इतर विद्यार्थ्यांच्या समोर आणि शिक्षिकेच्या समोरच या मुलीवर सपासप वार केले आहेत. त्यामुळे इतर विद्यार्थिनीमध्ये मोठी घबराट पसरली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थिनीला एका पालकांच्या मदतीने तातडीने वडगाव शेरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आरोपी तरुण दहावीच्या मुलीवर वार केल्यानंतर तेथून पसार झाला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पालक मोठ्या संख्येने जमले आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे. एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT