एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी; भाजपा नगरसेवकांचा निर्णय Saam Tv
मुंबई/पुणे

एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी; भाजपा नगरसेवकांचा निर्णय

सर्व नगरसेवकांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्त निधीस वर्ग करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे BJPGroup leader यांनी जाहीर केला आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

काल राज्याचे मुख्यमंत्री चिपळूण येथील पूरग्रस्त भागाचा पहाणी दौरा करण्यासाठी गेले होते. हा पहाणी दौरा सुरु असतानाच ते ज्या व्यापारीपोठेने जात होते त्यावेळी एका पूरग्रस्त महिलेने अत्यंत पोटतिडिकीने आक्रोश करत मुख्यमंत्र्यांसमोर मदतीसाठी टाहो फोडला होता. तो व्हीडीओ video काल खूप व्हायरलViral झाला त्या व्हीडीओमध्ये त्या महीलेने खासदार, आमदारांचे दोन महिन्यांचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्याचे आवाहन केले होते.

याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्त निधीस वर्ग करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे BJPGroup leader यांनी जाहीर केला आहे. याबाबतचे लेखी पत्र महापौरMayor किशोरी पेडणेकरKishori Pedanekar आणि महापालिका चिटणीस यांना पाठवले आहे.One month's salary for flood victims Decision of BJP corporators

राज्यात झालेल्या आणि सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. कोकण, विदर्भ, अमरावती, सांगली, सातारा, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी कित्येक दिवस पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

अनेक हातावर पोट असणाऱ्या कुटुंबीयांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले आहे. अशा प्रसंगी आपत्तीग्रस्त कुटूंबियांना पुन्हा उभं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज आहे. पूरग्रस्त भागातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात मदतीच्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहेत.

मात्र अजूनपर्यंत शासनाने यासाठी कोणती मदत जाहीर केली नाही. हिच संधी साधत भाजपाने मात्र आपल्या नगरसेवकांचे मानधन पुरग्रस्त भागासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबतची माहिती भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली. त्यासंबंधीचे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांना देण्यात आले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

HBD Ranveer Singh: एकाच वेळी तीन मुलींना डेट...; दिपिका आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता रणवीर सिंग?

Maharashtra Live News Update: शिवसेनेबरोबर आता रायगड जिल्ह्यात भाजपने राष्ट्रवादी विरोधात तोंड उघडले

Nashik : स्मशानभूमी शेड अभावी मृतदेहाची अवहेलना; अंत्यसंस्कारासाठी घ्यावा लागतोय प्लास्टिक पेपरचा आधार

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT