Mumbra Police Station कल्पेश गोरडे
मुंबई/पुणे

Mumbra Crime: कफ सिरफची नशा करण्याच्या वादातून एकाची हत्या; 7 जण ताब्यात

Mumbra Crime News: कफ सिरफ (खोकल्याचे लाल औषध) ची नशा करण्यावरुन सरनाम याचा काही लोकांशी वाद झाला.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

कल्पेश गोरडे, ठाणे

Mumbra Crime News: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंब्र्यात कफ सिरफची नशा करण्याच्या वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. सरनाम असे या 35 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्या झालेल्या व्यक्तीचे शव ताब्यात घेतले असून 7 संशयीत आरोपींनाही ताब्यात घेतले आहे. (intoxication of cough syrup)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील राशिद कंपाऊंड येथे झेंडेवाले बाबा परिसरात कफ सिरफ (खोकल्याचे लाल औषध) ची नशा करण्यावरुन सरनाम याचा काही लोकांशी वाद झाला. याच वादातून सरनाम या व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सरनाम याच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

सरनाम हा मूळचा उत्तर प्रदेश येथील बहराईच जिल्ह्यात राहणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे शव ताब्यात घेतले असून शवविच्छदनासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी 7 लोकांना ताब्यात देखील घेतले आहे. तसेच या हत्येता पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

Maharashtra Live News Update: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती

अपघातात मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी केक कापला; स्मशानभूमीतच वडिलांकडून लेकीचं वाढदिवस साजरा

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

SCROLL FOR NEXT