Pune crime news
Pune crime news Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! क्षुल्लक कारणावरुन मित्रानेच मित्राला संपवलं, आरोपी गजाआड

साम टिव्ही ब्युरो

पुणे : माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. किरकोळ वादातून (Pune crime update) एका तरुणाने त्याच्या मित्राला बांबुने बेदम मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कोंढव्यातील खडी मशीन चौकाजवळ घडली असून याप्रकरणी आरोपीला अटक (culprit arrested) करण्यात आली आहे. सुरेश राजू कसोटिया (32) असं हत्या झालेल्या आरोपीचं नाव आहे. तर तौसिफ साजीद बागवान (22) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादातून एका तरुणाने मित्राला बांबुने बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली. कोंडवा बुद्रुक येथे आंबेडकरनगर येथे राहणाऱ्या सुरेश राजू कसोटीया याची हत्या झाली आहे. याप्रकरणी सुरेशचा भाऊ विनोद कसोटीया याने कोंडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी तौसिफ साजीद बागवान याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश व तौसिफ हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. ते दोघे बिगारी काम करत होते.

दरम्यान, शुक्रवारी रात्री दोघेजण कोंढवा येथील खडी मशीन चौकाजवळ आले होते. त्यावेळी किरकोळ कारणावरुन त्यांच्यात भांडण झालं. त्यामध्ये तौसिफने सुरेशला बांबुने जबर मारहाण केली. या मारहाणीत सुरेश गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान सुरेशचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी काही वेळातच सुरेशचा मित्र तौसिफ बागवान याला अटक केली. तौसिफची चौकशी केल्यानंतर त्याने हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah Yoker: बुमराहच्या चेंडूनं हवेतच बदलली 'चाल'; गुल झालेली दांडी पाहून सुनीलला काही सुचेना VIDEO

Maharashtra Politics: लोकसभेच्या रणधुमाळीत विधानसभेची तयारी? नाशिक, दिंडोरीत सर्वपक्षीयांचा 'सोयीनं' प्रचार

Mahadev App Scam: महादेव ॲपचं श्रीलंका कनेक्शन, EOW ने 200 खात्यांमधील 3 कोटी रुपये गोठवले

IPL 2024 MI vs KKR : अखेरच्या सामन्यातही मुंबईचा पराभव; केकेआर संघाचं प्लेऑफचं तिकीट कन्फर्म

Asaduddin Owaisi: एक दिवस असा येईल जेव्हा हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल: असदुद्दीन ओवेसी

SCROLL FOR NEXT