Bhayandar News Saam Digital
मुंबई/पुणे

Bhayandar News : ४० झोपड्या जळून खाक...अनेक संसार उद्ध्वस्त; आझादनगर झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू

Bhayandar Fire News : भाईंदर पूर्व येथील आझाद नगर झोपडपट्टीला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत दीपक ऊर्फ पपू चौरसिया यांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले.

Sandeep Gawade

Bhayandar News

भाईंदर पूर्व येथील आझाद नगर झोपडपट्टीला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत दीपक ऊर्फ पपू चौरसिया यांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन लहान मुले व तीन अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश आहे. आगीची तीव्रता एवढी होती की निर्माण झालेला धूर एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत पसरला होता. अग्नीशमन दलाने सुमारे तीन तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले परंतू परिसरात प्लास्टिक व बांबूची गोदामे असल्याने आग पूर्णपणे विझवण्यास बराच कालावधी लागला.

आझादनगर परिसरात शेकडो अनधिकृत झोपड्या आहेत, त्यात काही कच्च्या व काही पक्क्या स्वरूपातील आहेत. शिवाय भंगार, प्लास्टिक व बांबूची गोदामे देखील याठिकाणी आहेत. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास यातील काही झोपड्यांना आग लागली. अनेक झोपड्या प्लास्टिकच्या ताडपत्रीनी बांधल्या असल्यामुळे आग वेगाने पसरली. त्यात याठिकाणी असलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणात भंगार समान, प्लास्टिक व बांबू असल्याने आगीने आणखी जास्त पेट घेतला. यावेळी झोपड्यांमधून असलेल्या काही गॅस सिलेंडरचे स्फोटही झाले. या स्फोटांचे आवाजही दूरपर्यंत ऐकू येत होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगीची माहिती मिळताच मिरा भाईंदर महानगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र आगीने भीषण स्वरूप प्राप्त केल्याने ती आटोक्यात येत नव्हती. त्यातच झोपडपट्टी भागातील गल्ल्या अत्यंत अरुंद असल्याने मोठ्या अडचणींचा त्रास सहन करावा लागला. महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी आसपासच्या महापालिकांशी संपर्क साधला व त्यांचे अग्निशमन दलही पाचारण केले. त्यामुळे मुंबई महापालिकेचे 7, ठाणे महापालिकेचे 4 व वसई विरार महापालिकेचे 3 अग्निशमन बंब यासह एकंदर तब्बल 24 बंब व तेवढेच पाण्याचे टँकर आग विझवण्याचा काम करत होते.आग नियंत्रणात येत असतानाच अग्निशमन दलाने ढिगारे उपसण्यास सुरुवात केली त्यात दीपक चौरसिया यांचा मृतदेह आढळून आला. आगीत सुमारे 40 झोपड्या व गोदामे जाळून खाक झाली. यात अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले. आयुष्यभराची जमापुंजी आगीत भस्मसात झाल्याने आता पुढे काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

प्राण वाचवताना झाला मृत्यू

आगीत मृत्यू झालेले दीपक चौरसिया हे त्याच परिसरातच रहात होते. त्यांचे पानाचे दुकान होते. आग लागल्याचे दिसताच त्यांनी त्या दिशेने धाव घेतली. अनेकांना बाहेर पडण्यास त्यांनी मदत केली. मात्र त्याचवेळी त्यांच्या समोरच गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्यात ते जबर जखमी झाले. त्यातच आगीने प्रचंड धूर निर्माण झाल्याने त्यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती परिसरातील रहिवाशांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

Nagpur: गँगस्टरच्या पत्नीसोबत अफेअर, महिलेचा मृत्यू; इप्पा गँगच्या मनात वेगळाच संशय, 'टोपी'च्या शोधात ४० लोक

Maharashtra Population: महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?

Raigad Politics : रायगडच्या वादाचा दुसरा अंक; राष्ट्रवादी भाजपमध्ये सुप्त संघर्ष

SCROLL FOR NEXT