BJP Saam TV
मुंबई/पुणे

काँग्रेस आज भाजपवर हसतय, एक दिवस पुर्ण देशात आमची सत्ता असेल.., मुंडेंनी ट्विट केली 'अटलवाणी'

या फोटोमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी 1997 मध्ये एनडीए चं सरकार पडलं त्यावेळी केलेलं वक्तव्य आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : काल देशातील उत्तर प्रदेश (UP) उत्तराखंड, गोवा (Goa), पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले या सर्व निकालांमध्ये भाजपने (BJP) सर्वाधिक जागा मिळवत पाचपैकी चार राज्यांमध्ये आपलं सरकार एकहाती स्थापन करण्याचा दावा देखील केला आहे.

संपुर्ण देशभरात भाजपचे (BJP) कार्यकर्ते विजयाचा जल्लोष साजरा करत असताना भाजपनेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी काँग्रेसवर निशाना साधत आणि भाजपचे दिवंगत नेते भाजपचे तेंव्हाचे सर्वेसर्वा अटल बिहारी वाजपेयी यांचा पराभव झाला त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याचा पेपर मधील फोटो ट्वीट केला आहे. या फोटोमध्ये अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी 1997 मध्ये एनडीए चं सरकार पडलं त्यावेळी केलेलं वक्तव्य आहे.

भाजपचा पराभव केवळ एक मताने झाल्याने काँग्रेस (Congress) नेते वाजपेयी यांच्यावर हसले होते त्यामुळे त्यांनी काँग्रेसला उद्देशून वक्तव्य केलं होत.

'आज आमचे सरकार केवळ एका मताने पडलं आहे. आमचे उमेदवार कमी आहेत म्हणून काँग्रेस आमच्यावरती हसत आहे, मात्र काँग्रेसने एक गोष्ट कधीच विसरू नये, एक दिवस असा येईल पुर्ण भारतवर्षामध्ये भाजपची सत्ता येईल आणि सगळे काँग्रेसवर हसतील असं त्यांनी म्हंटलं होत तेच आज पंकजा मुंडेनी ट्वीट केलं आहे.'

यामधून 'अटलवाणी' खरी ठरल्याचं तर दिसत आहेच शिवाय भाजपने केलेली घौडदौड देखील त्यांनी यामधून अधोरेखीत केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT