ओमायक्रॉन: अंबरनाथ पालिका सतर्क; परदेशातून आलेल्यांनी माहिती देण्याचं आवाहन अजय दुधाणे
मुंबई/पुणे

ओमायक्रॉन: अंबरनाथ पालिका सतर्क; परदेशातून आलेल्यांनी माहिती देण्याचं आवाहन

सध्या अंबरनाथमध्ये 'ओमायक्रॉन'चा शिरकाव झालेला नसला, तरी नागरिकांनी मात्र गाफील राहून चालणार नाही.

अजय दुधाणे

अंबरनाथ: दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 'ओमायक्रॉन' (Omicron Variant) या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ पालिका (Ambernath Municiple Corporation) सतर्क झाली आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी माहिती देण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं असून गेले काही दिवस बंद असलेलं डेंटल कॉलेज कोव्हीड सेंटरही पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. (Omicron: Ambernath Municipality alert; Appeal for information from foreigners)

हे देखील पहा -

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा 'ओमायक्रॉन' हा नवा व्हेरियंट सापडला असून तो दुसऱ्या लाटेतल्या डेल्टा व्हेरियंट पेक्षाही अधिक घातक असल्याचा इशारा अभ्यासकांनी दिला आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत (Dombivali) आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रवाशाला 'ओमायक्रॉन' व्हेरियंटचीच लागण आहे की नाही, हे समजायला ७ दिवस लागणार आहेत. मात्र हा प्रवासी विमानप्रवासात ९६ प्रवाशांच्या संपर्कात आला होता. तसंच मुंबई ते डोंबिवली असा टॅक्सीने प्रवास केला होता, अशा खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे मुंबईपासून ते ठाणे जिल्ह्यापर्यंतच्या सर्व शहरं आणि गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

याच अनुषंगाने अंबरनाथ पालिकेने परदेशातून जर कुणी प्रवासी अंबरनाथला आले असतील, तर त्यांनी काही दिवस विलगीकरणात राहावं, आणि कोरोनाची काही लक्षणं जाणवली, तर तातडीने पालिका प्रशासनाशी संपर्क साधावा, असं आवाहन केलंय. सोबतच अंबरनाथ पालिकेच्या डेन्टल कॉलेज कोव्हीड सेंटरचा (Covid Center) एक ब्लॉक सध्या सुरू करण्यात आला असून तिथे तीन डॉक्टर्स कार्यरत करण्यात आले आहेत. तर रुग्णसंख्या वाढल्यास इतर विभागही एक ते दोन दिवसात सुरू करण्याची पालिकेची तयारी आहे. ऑक्सिजनचा पुरेसा साठा करण्याची आणि हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याची यंत्रणा पालिकेकडे असून त्यामुळं सध्या काळजी करण्याचं काहीही कारण नसल्याची माहिती अंबरनाथ पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण यांनी दिली आहे.

सध्या अंबरनाथमध्ये 'ओमायक्रॉन'चा शिरकाव झालेला नसला, तरी नागरिकांनी मात्र गाफील राहून चालणार नाहीये. पहिल्या लाटेनंतर नागरिक कोरोना संपल्याच्या अविर्भावात वावरले आणि दुसरी लाट ही जास्त घातक ठरली. आता 'ओमायक्रॉन'मुळे तिसरी लाट आलीच, तर ती दुसऱ्या लाटेपेक्षाही भयंकर ठरू शकते. त्यामुळं दुसऱ्या लाटेत बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, आयसीयू बेड मिळवण्यासाठी आपल्यावर जी काही वेळ आली होती, ती आठवून आत्तापासूनच काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ram-Leela Movie: रामलीला चित्रपटासाठी दीपिका पदुकोण नव्हती पहिली पसंती; तर या प्रसिद्ध अभिनेत्रीला  करण्यात आला होता रोल ऑफर...

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

SCROLL FOR NEXT