मुंबई: जगाची चिंता वाढवणारा कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) भारतात पसरू नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. प्रवाशांची तपासणी कशा पद्धतीने होतेय याचा आढावा मुंबईच्या महापौर (Mayor of Mumbai) किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी सोमवारी घेतला. (Omicron: Kishori Pednekar reviews corona inspection at Mumbai airport)
हे देखील पहा -
यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत उप महापौर अँड. सुहास वाडकर यांनीही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी (Corona Test) कशा पद्धतीने करण्यात येते याची पाहणी करून योग्य ते निर्देश दिले आहेत. राज्यात एकीकडे कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी ओमायक्रॉन ह्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे सध्या लसीकरणावर (Vaccination) जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरु आहे. तसेच आता अनेक जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.