Congress flag  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील काँग्रेस भवनात पक्षाच्या भरभराटीसाठी होम-हवन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

होम-हवन करण्याची घटना पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune News : पक्षाची भरभराट व्हावी, पक्षातील गटातटात एकी व्हावी, यासाठी 'सर्व सिद्धी' पुजा करून होम-हवन करण्याची घटना पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये घडली आहे. रविवारी सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान अध्यक्षांच्या केबिनच्या शेजारील सभागृहात होम-हवन झाले आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील (Pune) शिवाजीनगर मधील काँग्रेस भवनची स्थापना १९४० मध्ये झाली आहे. काँग्रेस भवन स्थापन करण्यासाठी काकासाहेब गाडगीळ, शंकरराव मोरे आणि केशवराव जेधे यांनी पुढाकार घेतला होता. धर्मनिरपेक्षता, हे तत्व अंगीकारलेल्या काँग्रेस भवनमध्ये ८२ वर्षांत पहिल्यांदाच होम- हवन झाले आहे.

राष्ट्रीय आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले, "महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारसा सांगणाऱ्या काँग्रेस भवनमध्ये होम-हवन होणे ही चुकीची घटना आहे. अशा प्रकारामुळे काँग्रेस भाजपची नक्कल करीत आहे, असे लोकांना वाटू शकते. काँग्रेसने या घटनेचा फेरविचार करणे गरजेचे आहे. पक्षासाठी हा आत्मघातकी प्रकार आहे'.

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, 'काँग्रेस पक्षाची भरभराट व्हावी, पक्षाचा सुवर्णकाळ पुन्हा यावा, या उद्देशाने कार्य सिद्धी पूजा केली. त्यामध्ये होम-हवनही होते. तसेच विविध प्रकारच्या पूजांचाही समावेश होता. काँग्रेसचा शहराध्यक्ष मी सात जुलै रोजी झालो'

'तेव्हापासूनच काँग्रेस भवनमध्ये पुजा करण्याचे माझ्या मनात होते. परंतु १४ नोव्हेंबर नंतर पूजा करण्यास मला गुरूंनी सांगितले होते. शुक्राचा अस्त झाला असल्यामुळे ही पूजा केली आहे', असे शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात, माजी सरपंच आणि नातीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

PM Kisan Yojana: 'त्या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता, कारण काय? वाचा

Vice President Election: उपराष्ट्रपती पदाच्या मतदानावेळी India आघाडीची नाही, तर BJPची मतं फुटली; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

Nepal News : महाराष्ट्रातील १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले, सर्वाधिक पर्यटक 'या' जिल्ह्यातील | VIDEO

Maharashtra Live News Update : माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण, पूजा गायकवाडला 3 दिवसाची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT