जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर जांभुळ फाटा येथे भीषण अपघात
२१ वर्षीय अविनाश दोडमणे याचा जागीच मृत्यू
भरधाव हायवाच्या धडकेत मोटारसायकल चक्काचूर, चालक फरार
वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू
21-year-old Avinash Dodmane killed in Mumbai Pune highway accident : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात २१ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला. मावळ नजीकच्या जांभूळ फाटा येथील माऊली हॉटेल समोर रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समोर आलेय. भरधाव वेगात आलेल्या हायवाच्या धडकेत मोटारसायकलस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर हायवा चालक वाहनासह पसार झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटानस्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून वाहन चालकाचा तपास करण्यात येत आहे. (Old Mumbai Pune highway accident news)
भीषण अपघातामधील मृत तरुणाचे नाव अविनाश चंद्रकांत दोडमणे (वय 21, रा. शिवतेजनगर, बिबेवाडी, पुणे) असे आहे. तो आपल्या एमएच-14 एलवाय 3205 या क्रमांकाच्या दुचाकीवरून रस्ता ओलांडत होता. त्यावेळी हा दुर्दैवी अपघात झाल्याचे समजतेय. या धडकेत त्याच्या पोटाला व हाताला गंभीर दुखापत झाली. धडक इतकी भयंकर होती की तरूणाचा जागीच मृत्यू झाला. मोटारसायकलचाही चक्काचूर झाला आहे. बिबेवाडीमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तरूण कामावरून घराकडे येत होता, त्यावेळी काळाने घाला घातला. (Hit-and-run truck case Pune Wadgaon police investigation )
या प्रकरणी मृताचा चुलत भाऊ कुमार जयभीम दोडमणे (वय 28, रा. शिवतेजनगर, बिबेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात हायवा चालकाने निष्काळजीपणे, अविचाराने व भरधाव वेगात वाहन चालवून अपघात घडवला म्हणून गुन्हा झाला आहे. या घटनेवरून वडगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. 270/2025 भा.दं.सं. कलम 281, 125 (ब), 106, 324 (4), मो.वा.का. कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम करीत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.