Vasai Fire News चेतन इंगळे
मुंबई/पुणे

Vasai News: ऐन म्हातारपणात नशीबानं केली थट्टा; वसईतील वृद्ध दाम्पत्याचं घर आगीत खाक, आजी-आजोबा रस्त्यावर

Vasai Fire News: आज, रविवारी रात्री ३ च्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली. आग (Fire) लागली तेव्हा हे दाम्पत्य गाढ झोपेत होते.

वृत्तसंस्था

चेतन इंगळे, वसई-विरार

Vasai Fire News: वसईत राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्यावर ऐन म्हातारपणात रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. वसईतील भुईगांव ब्रम्हपाडा येथे एका वृद्ध दाम्पत्याच्या घराला आग लागून संपूर्ण घर जळून खाक झालं आहे. त्यामुळे आता या दाम्पत्याला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. (Vasai Latest News)

वसईतील (Vasai) भुईगांव ब्रम्हपाडा राहणारे काशीनाथ लक्ष्मण निजाई वय ८० आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई काशीनाथ निजाई वय ७५ असं या वृद्ध दाम्पत्याचं नाव आहे. हे आजी-आजोबा आपल्या झोपडी वजा घरात गेली 50 वर्षांपासून राहत होते. आज, रविवारी रात्री ३ च्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली. आग (Fire) लागली तेव्हा हे दाम्पत्य गाढ झोपेत होते. त्यांच्या अंगाला चटका लागल्यावर त्यांची झोप मोडली आणि ते जळणाऱ्या घरातून कसेबसे बाहेर पडले.

आग लागल्याचं दिसताच आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या घरावर पाणी मारुन आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आग आटोक्यात आली नाही. शेवटी वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली आणि तब्बल ४ तासांत आग विझवली. या आगीत वृद्ध दाम्पत्याचं संपूर्ण घर जळून खाक झालं आहे. ही आग नेमकी कशाने लागली हे समजू शकले नाही. या दाम्पत्याला मूलबाळ नसल्याने शासनाने त्यांना मदत द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT