OBC आरक्षणाबाबत आजच्या कॅबिनेट बैठकीत काय घडलं?
OBC आरक्षणाबाबत आजच्या कॅबिनेट बैठकीत काय घडलं? SaamTvNews
मुंबई/पुणे

OBC आरक्षणाबाबत आजच्या कॅबिनेट बैठकीत काय घडलं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

~ रश्मी पुराणिक

ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढण्याबाबत मंत्रिमंडळात जी चर्चा झाली त्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका मांडली. आम्ही कोणत्याही आरक्षणाच्या  विरोधात नाही, पण आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण मिळायला हवं असेही ते यावेळी म्हणाले. तसेच, ओबीसी समाजाचे नुकसान होईल, अशी कोणतीही गोष्ट महाविकास आघाडी सरकारने करू नये अशी आक्रमक भूमिका भुजबळ यांनी मांडली.

हे देखील पहा :

तर, जितेंद्र आव्हाड यांनी वंजारी समाजालाही ओबीसी समाजातूनच आरक्षण मिळावे, अशी भूमिका मांडली. विमुक्त जमाती व भटक्या जाती प्रवर्गातून वंजारी समाजाला जे आरक्षण देण्यात येते त्यातून वंजारी समाजाचे नुकसान होत आहे.

विशेषतः शैक्षणिक आरक्षणाबाबत नुकसान होत आहे. त्यामुळे वंजारी समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्यात यावे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणुकीत ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आज भुजबळ आक्रमक झाले होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News | गुप्तांगावर बॉल लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू

ICC Women's T20 WC: ICC कडून महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! या दिवशी भिडणार भारत- पाकिस्तान संघ

Madha Loksabha: मोहिते पाटलांनी स्वतःसाठी खड्डा खणला; लुंग्यासुंग्यांचे आव्हान मानत नाही... रणजितसिंह निंबाळकरांचे टीकास्त्र

Mumabi's Famous Food: 'हे' आहेत मुंबईचे सुप्रसिद्ध खाद्यपदार्थ

Latur Rikshaw Viral Video | भर उन्हात रिक्षावाल्याचा एक नंबर जुगाड!

SCROLL FOR NEXT