Ganpati : विरारमधील वैती कुटुंबीयांनी कोरोना योद्ध्यांना दिली अनोखी सलामी

विरारमधील वैती कुटुंबीयांनी गणराया समोर कोरोना जागतिक महामारी मध्ये काम करणाऱ्या देवदूतांना देखाव्याच्या माध्यमातून अनोखी सलामी दिली आहे.
Ganpati : विरारमधील वैती कुटुंबीयांनी कोरोना योद्ध्यांना दिली अनोखी सलामी
Ganpati : विरारमधील वैती कुटुंबीयांनी कोरोना योद्ध्यांना दिली अनोखी सलामीचेतन इंगळे

चेतन इंगळे

वसई/विरार : विरारमधील वैती कुटुंबीयांनी गणराया समोर कोरोना जागतिक महामारी मध्ये काम करणाऱ्या देवदूतांना अनोखी सलामी आपण सर्वच मागील दोन वर्षापासून करोना महामारीचा सामना करीत आहोत. या दोन वर्षाच्या कालावधीत आपण प्रत्येक सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले आहेत. यातील एक सण म्हणजे आपल्या सर्वांना कायम उर्जा देणारा तो म्हणजे गणेशोत्सव, हा उत्सव यंदा देखील आपण साध्या पद्धतीने साजरा करीत आहोत.

हे देखील पहा :

तरी देखील अनेक भागात लाडक्या गणरायाचे स्वागत त्याच उत्साहात प्रत्येक भाविकांने केल्याचे आपण पाहिले. शासनाच्या नियमांचे पालन करून यावर्षी वैती कुटुंबीयांनी कोरोना महामारीत काम करणाऱ्या देवदूतांचे चित्र तयार करून एक सामाजिक संदेश दिला आहे.आशा वर्कर्स, पोलीस, डॉक्टर, स्वच्छता दूत, परिचारिका, देशातील सैनिक, यांचा सुंदर असा देखावा गणराया समोर तयार केला आहे. विरार पूर्व टेंभीपाडा गावातील वैती कुटुंबाच्या घरी दहा दिवसांच्या बाप्पाला मोठ्या थाटात विराजमान केलं जातं. या वर्षीही देखील त्याच उत्सवात बाप्पाचं आगमन झाले आहे.

Ganpati : विरारमधील वैती कुटुंबीयांनी कोरोना योद्ध्यांना दिली अनोखी सलामी
Baramati : शेततळ्यात पडून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू!
Ganpati : विरारमधील वैती कुटुंबीयांनी कोरोना योद्ध्यांना दिली अनोखी सलामी
Gauri Ganpati : चक्क सुनांना बनवलं गौराई!

या आधी देखील वैती कुटुंबीयांनी सामाजिक, राष्ट्रीय, ऐतिहासिक, असे चलचित्रच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिले आहेत. पण या वर्षी एक वेगळी संकल्पना घेऊन कुटुंबातील सर्वच सदस्यांनी मागच्या एक महिन्यापासून तयारी करून स्वखर्चाने बाप्पा समोर कोरोना युद्धांचा देखावा तयार करून सलामी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com