BMC  Saam Tv
मुंबई/पुणे

Cabinet Decisions : महानगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढवली; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय

मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या मोठ्या महापालिकेत किमान दहा स्वीकृत सदस्य असतील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात मोठ्या महानगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या 10 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लहान महानगरपालिकांमध्ये सदस्य संख्येच्या १० टक्के स्विकृत नगरसेवक होऊ शकतात.

मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार आता महापालिकेत ५ नाही तर १० स्वीकृत नगरसेवक असतील. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या मोठ्या महापालिकेत किमान दहा स्वीकृत सदस्य असतील.

महापालिकेत एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के स्वीकृत नगरसेवक होऊ शकतात किंवा दहा स्वीकृत नगरसेवक स्वीकृत होऊ शकतात. यापैकी जी संख्या छोटी असेल त्यानुसार स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

>> राज्य वेतन सुधारणा समितीचा (बक्षी समिती) अहवाल खंड-२ स्वीकारला. अनेक पदांच्या वेतन त्रुटी दूर. अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ.

>> महानगरपालिकांमध्ये नामनिर्देशित पालिका सदस्यांच्या संख्येत सुधारणा.

>> संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ अनाथांपर्यंत पोहचवण्यासाठी तर्पण फाऊंडेशन समवेत करणार.

>> शासकीय जमिनीवर बेकरी व्यवसायासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीस मॉडर्न फूड एंटरप्राइझेसबरोबर व्यावसायिक करारास मान्यता.

>> गुरे ढोरे रस्त्यावर ने आण करण्यासंदर्भात आता कैदेऐवजी दंडाची तरतूद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

SCROLL FOR NEXT