Mumbai Crime news  Saam Tv
मुंबई/पुणे

Crime : धक्कादायक! पाकिस्तानी प्रेयसीसोबत लग्नासाठी नवऱ्याकडून बायकोचा छळ; सासरच्याकडून फिनेल पाजण्याचा प्रयत्न

पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या NRI पतीविरोधात तक्रार दाखल

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai Crime News : पाकिस्तानी प्रेयसी सोबत लग्न करण्यासाठी आपल्या पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या NRI पतीविरोधात मुंबईच्या मालाड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी वृद्ध वडील हे आता सरकार आणि पोलिसांकडे फेऱ्या मारत आहेत. (Latest Marathi News)

मालाडची रहिवासी असलेल्या महिलेचा विवाह 20 फेब्रुवारी 2008 रोजी NRI (अनिवासी भारतीय असलेल्या ) व्यक्तीसोबत झाला. आरोपी नवरा यांचे कुटुंब मुंबईतील नाहूर पूर्वे मध्ये राहत आहे. आरोपी नवरा याचे लंडनमध्ये आयुर्वेदिक औषधांचे दुकान आहे. लग्नानंतर आरोपी व्यक्ती आणि तिचा नवरा हे दोघेही लंडन या ठिकाणी राहण्यासाठी गेले. मात्र, मागील तीन वर्षापासून आरोपी नवरा आपल्या पत्नीसोबत सातत्याने भांडू लागला.

आपल्या पतीचे पाकिस्तानी मुली सोबत प्रेम संबंध असल्याचे पीडित महिलेला समजले. त्यानंतर त्या महिलेने आपल्या पतीच्या अवैध संबंधांना विरोध केल्यावर त्याने पीडिता महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. शेवटी आरोपी व्यक्तीने याने पीडित महिलेला घटस्फोटाची नोटीस देखील पाठवली.

पीडित महिलेचा पती याचे पाकिस्तानी (Pakistan) महिलेशी अवैध संबंध आहे. त्यामुळे लग्न करण्यासाठी पीडितेचा काटा काढणे योग्य राहील. या हेतूने आरोपी व्यक्तीने यांच्या घरातील सर्व मंडळी यात पीडित महिलेचे सासू-सासरे,ननंद दीर या सर्वांनी जबरदस्तीने पीडितेला फिनेल पाजण्याचा प्रयत्न केला. सासरच्या छळास कंटाळून पीडित महिला मालाड येथील वडिलांच्या घरी पोहोचली.

या प्रकरणी वडिलांच्या मदतीने पीडित महिलेने न्यायालयात देखील तक्रार दाखल केली आहे. तसेच मालाड पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर मालाड पोलिसांचे एक पथक तपासासाठी पीडित महिलेच्या पतीच्या नाहूर येथील घरी पोहोचले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जीमला जाण्यापूर्वी प्रत्येकाने या मेडिकल टेस्ट करून घ्याव्यात, हार्ट अटॅकचा धोका टळेल

शिवसेना मनसेच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं, कोणत्या वार्डातून कोणाचा उमेदवार?

Maharashtra Live News Update: कफ परेडला जाणाऱ्या मेट्रोचे दरवाजे बंद होईना, प्रवाशांचे हाल

Watches Design: डेली ऑफिस वेअरसाठी हातात घाला 'हे' युनिक डिझाइनचे वॉच; प्रोफेशनल लूक दिसेल क्लासी!

भाजपचा डाव काँग्रेसच्या जिव्हारी, २ माजी आमदारांनी घेतलं कमळ, शेकडो समर्थकांनी सोडली साथ

SCROLL FOR NEXT