OBC विद्यार्थ्यांत्यांची नागपूरवारी थांबली; महाज्योती उपकेंद्र पुण्यात Saam TV
मुंबई/पुणे

OBC विद्यार्थ्यांत्यांची नागपूरवारी थांबली; महाज्योती उपकेंद्र पुण्यात

महाज्योतीचे मुख्यालय नागपूर येथे उभारण्यात आले आहे, मात्र ओबीसी विद्यार्थ्याना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी, तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विद्यार्थ्यांना दरवेळी नागपूरला जावे लागत होते.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : राज्य शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी स्थापन झालेल्या महाज्योती (Mahajyoti) या स्वायत्त संस्थेचे उपकेंद्र पुण्यात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

महाज्योती मुख्यालय हे नागपूर येथे उभारण्यात आले आहे. त्यामुळे OBC विद्यार्थ्याना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी, तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विद्यार्थ्यांना दरवेळी नागपूरला जावे लागत होते.

त्यामुळे संस्थेचे उपकेंद्र पुण्यात व्हावे अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. त्यासाठी महाज्योतीचे संचालक प्रा.दिवाकर गमे यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. तसेच शासन स्तरावर पाठपुरवठा करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या या मागणीला यश आले असून महाज्योतीचे उपकेंद्र पुण्यात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुण्यातील विश्रांतवाडी (Vishrantwadi) येथे हे उपकेंद्र उभारण्यात येणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून नवीन विमानसेवेची प्रतीक्षा

Hotel Fire : झोपेतच काळाचा घाला! श्रावण सोमवारी मंदिराबाहेरील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आग, ६ जण जिवंत जळाले अन्

High cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल 30 दिवसांत कमी कराचंय? आजच हे 3 बदल करा, लगेच दिसेल परिणाम

Nagpanchami Special : तुळजाभवानी मंदिरात पुरुष भाविकांना प्रवेश बंद, नेमकं काय कारण?

BJP New Team: भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा आज, कुणाला कोणती जबाबदारी मिळणार? संभाव्य यादी समोर

SCROLL FOR NEXT