School Reopened:"विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही"- आदित्य ठाकरे Saam Tv
मुंबई/पुणे

School Reopened:"विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही"- आदित्य ठाकरे

राज्यात शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. परंतु, शाळा सुरू होत असले, तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंधनकारक नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. परंतु, शाळा सुरू होत असले, तरी पालकांनी विद्यार्थ्यांना (students) शाळेत पाठवणे बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटत आहे. त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. ज्यांना वाटते रिस्क घेऊ नये, त्यांनी घेऊ नये. आजपासून शाळा (School) सुरू होत असले तरी पुढची पावले कशी टाकायची हे शाळा आणि पालकांनी ठरवायचे आहे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

हे देखील पहा-

कोरोना (Corona) महामारीच्या काळात तब्बल ७०० दिवस शाळा बंद होते. यामुळे ज्या जिल्ह्यामध्ये (district) कोरोनाचा धोका कमी झाला आहे, अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे. आज राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या प्रश्नसंचाचे एक सील नियमबाह्य पद्धतीने नागपुरात एका परीक्षा केंद्रावर फोडण्यात आल्याचा आरोप देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.

यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी या प्रकरणाची माहिती घेत आहे. जर या प्रकरणात काय चूक असेल तर योग्य कारवाई करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रकृतीवरून विरोधकांकडून सतत टीका होत असतात. यावर बोलत असताना आपण विरोधाकांकडे लक्ष न देता काम करत राहावे. जनता मुख्यमंत्र्याबरोबर आणि आमच्या बरोबर ठामपणे उभी आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत एकदम ठीक आहे.

लवकरच मुख्यमंत्र्यांना ऍक्‍शनमध्ये बघू, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली आहे. वैतरणा जलाशयावर १०० मेगावॅट अक्षय ऊर्जानिर्मिती होणार आहे. मुंबईकरिता (Mumbai) हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. वीज निर्मिती केंद्र आणि धरण असलेली मुंबई ही देशातील एकमेव महापालिका असणार आहे. या धरणाकरिता २० मेगावॅट हायडल प्लांट आणि ८० मेगावॅट फ्लोटिंग सोलारचा प्रयोग करणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT