Non-agricultural tax Saam Tv
मुंबई/पुणे

राज्यातील सर्व नागरी क्षेत्रातील अकृषिक कर वसुलीला स्थगिती, मात्र मुंबईकरांना सूट नाही

ही रक्कम अवाजवी असल्याने सर्वपक्षीय आमदारांनी त्याला विरोध केला होता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई: अकृषिक कर (Non-agricultural tax) वसुलीला राज्यात स्थगिती देण्यात आली आहे. 2001 पासून 2021 पर्यंत थकबाकी आणि चालू अकृषिक कर वसुली सुरु होती. ही रक्कम अवाजवी असल्याने सर्वपक्षीय आमदारांनी याला विरोध केला होता. यामुळे राज्यातील सर्व नागरी क्षेत्रातील अकृषिक कर वसुलीला स्थगिती देण्यात आलीये.

मुंबई उपनगरातही (Mumbai Suburban) अकृषिक कराला स्थगिती देण्यात आलीये. पण हा निर्णय मुंबईल लागू नाही. मुंबईकरांना हा कर भरावाच लागणार आहे.

शेतीच्या जमिनीवरच्या इमारतीच्या पुनर्विकासाचा मुद्दा आज सभागृहात उपस्थित करण्यात आला. अकृषिक कर (Non-agricultural tax) रद्द करावा अशी आमदारांची मागणी होती. अकृषिक करामुळे इमारतीमधील रहिवाशांवर आर्थिक भर पडतो, त्यामुळे हा कर रद्द करावा, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभेत केली.

सभागृहाचा सुर बघून तात्पुरती स्थगिती देतो. मात्र, मुंबई शहराला ही स्थगिती लागू नाही. मुंबई उपनगरात कराला स्थगिती असेल, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले.

मुंबई उपनगर वासियांवरील आर्थिक बोज्यावर लक्षवेधी

मुंबई उपनगर वासियांवर जो आर्थिक बोजा टाकला त्यावर लक्षवेधी होती. अकृषिक कराला चंद्रकांत पाटील यांनी त्यावेळी स्थगिती दिली होती. मात्र, या सरकारने 60 लाख इमारतींना व्याज लावून अकृषिक कर लादला. याला तातडीने स्थगिती दिली पाहिजे, अशी आम्ही मागणी केली. त्याला आता महसूल मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे, अशी माहिती भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात पाडवा पहाटचा उत्साह, सारसबागेत मोठी गर्दी

Maharashtra Rain Alert : ऐन दिवाळीत पावसाचा हाहाकार! विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस, आज ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा

Solapur Politics: 'ऑपरेशन लोटस'ला धक्का; इनकमिंगला भाजपमधून विरोध, देशमुख-माने संघर्ष चव्हाट्यावर

Diwali Snacks : फराळ खाऊन कंटाळलात? दिवाळीला खास बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

नेहलनं बसीरच्या मांडीवर डोकं ठेवलं, केक भरवला; 'Bigg Boss 19'च्या घरात प्रेमाचे वारे, सदस्यांच्या प्रतिक्रिया पाहून बसेल धक्का-VIDEO

SCROLL FOR NEXT