Devendra Fadnavis, PM Narendra Modi Saam TV
मुंबई/पुणे

PM मोदींनंतर देवेंद्र फडणवीस सक्षम नेतृत्व; खासदारकी देण्याची ब्राह्मण महासंघाची मागणी

भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून ही मागणी करण्यात आली.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर (Pm Narendra Modi) भाजपला सक्षम नेतृत्व देणाऱ्या पहिल्या दोन तीन नावांमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा समावेश आहे. त्यामुळे २०२४ मध्ये फडणवीस यांना पुण्यातून खासदारकी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून ही मागणी करण्यात आली. (Devendra Fadnavis News)

प्रत्येकवेळी अखिल भारतीय महासंघ पुण्यात भाजपच्या मागे ठामपणे उभा आहे, त्यामुळे 2024 ला देखील देवेंद्र फडणवीस यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अशा आशयाचे पत्र देखील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लिहिलं आहे.

'तुम्ही फडणवीस यांची जी निवड केली आहे ती अतिशय सार्थ असून दिल्लीतलं राजकारणाची फडणीस यांची सुरुवात पुण्यातून हवी' अशी इच्छा देखील अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाकडून व्यक्त करण्यात आली. (Devendra Fadnavis Todays News)

ब्राम्हण महासंघाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लिहलेलं पत्र

Akhil Bharatiya Brahman Mahasangh BJP Latter

भाजपने नुकतीच संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीची पुनर्रचना केली. संसदीय मंडळात मोठा बदल करत नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांना हटवण्यात आलं. याशिवाय 15 सदस्यीय केंद्रीय निवडणूक समितीतही या नेत्यांना स्थान मिळालेले नाही.

दुसरीकडे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मात्र भाजपने केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समावेश केला आहे. या निर्णयाकडे महाराष्ट्र आणि केंद्रातील मोठा राजकीय बदल म्हणून पाहिले जातंय. एकीकडे प्रसिद्ध केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना संसदीय मंडळातून हटवल्यामुळे त्यांचे डिमोशन केल्याची जोरदार चर्चा आहे. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीतील वजन वाढल्याने त्यांना प्रमोशन मिळाल्याचे बोलले जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एसटी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर! सरकारकडून मोठी घोषणा, ६ हजार बोनस आणि...

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime: नाशिक जिल्हा....; पुस्तकांऐवजी बॅगेत कोयता अन् चॉपर, महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे फॅड

SCROLL FOR NEXT