Water Scarcity
Water Scarcity Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Water Cut: पुणेकरांना पाणीकपातीची झळ बसणार, संपूर्ण शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

Dnyaneshwar Choutmal

Pune Water Supply: हवामान विभागाने यंदा मान्सून उशिरानं दाखल होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जूनमध्येही यंदा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेने शहरात दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे निणर्य घेतला आहे. (Latest Marathi News)

त्यामुळे पुणे (Pune) शहरात आता दर गुरुवारी पाणीपुरवठा (Water Supply) बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र गेल्या शुक्रवारी नागरिकांच्या अनेक ठिकाणी पाणी सुरळीत न आल्याच्या तक्रारी होत्या आणि शनिवारीही काही भागात नागरिकांना याच त्रासाला सामोरे जावे लागले. शनिवारीही काही भागात पाणी न मिळाल्याची नागरिकांच्या तक्रारी होत्या. शिवाजीनगर गावठाण, मुंढवा,प्रभात रस्ता, केशवनगर या भागात पाणीचं आलं नाही. (Pune News)

यंदा पाऊस भरपूर प्रमाणात पडला तर पाण्याचा प्रश्न मिटेल मात्र पावसाचं प्रमाण कमी झालं तर भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे आगामी काही दिवसाच पाणी नियोजन करण्याच्या दृष्टीने जून महिना अखेरपर्यंत प्रत्येक गुरुवारी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे. या निर्णयाची अमलबजावणी 18 मे पासून सुरु झाली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पाणी कपातीची झळ बसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT