Pune Water Supply: पुणेकरांनाे, पाणी जपून वापरा! शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या कारण
No Water Supply In Pune On Coming Friday Know The Reason Saam TV
मुंबई/पुणे

Pune Water Supply: पुणेकरांनाे, पाणी जपून वापरा! शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या कारण

Siddharth Latkar

- सागर आव्हाड

विद्युतविषक कामांसाठी पुणे शहराचा पाणी पूरवठा येत्या शुक्रवारी (ता. 24) बंद राहणार असल्याची माहिती पुणे महापालिका पाणी पूरवठा विभागाने कळवली आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

पुणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिलेल्या माहितीनूसार पाणी व्यवस्थापनाच्या देखभाल दुरुस्तीची कामे तसेच विद्युतविषयक कामे हाती घेतली जाणार आहेत. या कामांमुळे शुक्रवारी (ता. 24) संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहील तसेच शनिवारी (ता. 25) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होईल.

जगताप म्हणाले पर्वती एमएलआर टाकी, सर्व पेठा, पर्वती एचएलआर टाकी, पद्मावती, बिबवेवाडी, सॅलिसबरी पार्क, पर्वती एलएलआर टाकी, सिंहगड रस्ता आणि अंतर्गत समाविष्ट गावे, एसएनडीटी टाकी परिसरातील गोखलेनगर, शिवाजीनगर, वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, बावधन, पाषाण, संपूर्ण कोथरूड, गांधीभवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसार टाकी, वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी परिसर, चतुःशृंगी टाकी परिसर, पाषाण पंपिंग व सूस गोल टाकी परिसर, लष्कर ते खराडी पंपिंग, लष्कर केंद्र, नवे व जुने होळकर जलकेंद्र, जागतिक पाणीपुरवठा योजना चिखली या भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

दरम्यान नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन पुणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajaj CNG Bike: जगातील पहिली CNG बाईक Freedom आज होणार लॉन्च, जबरदास्त फीचर्ससह किती आहे किंमत?

Solapur Breaking : शेतकऱ्यावर कोसळलं आभाळ, महावितरणच्या विद्युत तारेने केला घात; ओढ्यात विजेचा धक्का लागून 24 म्हशींचा मृत्यू

Aadhaar Card: आता आधार कार्ड बनवायला लागू शकतात 6 महिने, UIDAIने केले 3 मोठे बदल

Shukra Rashi Parivartan : ४ दिवसांत ३ राशींचे नशीब उजळणार; यशाचा मार्ग गवसणार, वाचा

Pune Tourist Places: पुण्यात पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागू! कुठल्या ठिकाणी जमावबंदी आणि काय आहेत नियम? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT