31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर नो-व्हेईकल झोन Saam Tv
मुंबई/पुणे

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर नो-व्हेईकल झोन

या प्रमुख रस्त्यावर आज संध्याकाळी 7 पासून उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत नो-व्हेईकल झोन

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे - नववर्षाच्या स्वागतासाठी लष्कर परीसरातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता या ठिकाणी तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या रस्त्यावर आज संध्याकाळी 7 पासून उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत  नो-व्हेईकल झोन करण्यात आला आहे.  

गुडलक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार, झाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौक, हॉटेल अरोरा टॉवर चौक ते ट्रायलक हॉटेल चौक (पुलगेट चौकी) दरम्यान नो-व्हेईकल झोन करण्यात आला आहे. या रस्त्यावरील वाहतूक अन्य रस्त्यांवर वळविण्यात येणार आहे.

हे देखील पहा -

तसेच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर आज गर्दी करतात. त्यामुळे उद्या नवीन वर्षी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री उशिरा गर्दी संपेपर्यंत शिवाजी रोडवर चार चाकी वाहने व बसगाड्यांना वाहतुकीस बंदी असणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, जंगली महाराज रोडचा वापर करावा लागणार आहे.

तर एमजी रोडकडे येणारी वाहतूक ही 15 ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात आली आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून यावरील वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस स्टेशन चौकाकडे वळविण्यात येणार आहे. ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक ताबूत स्ट्रीटरोडमार्गे वळविण्यात येणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी PM मोदींचं नव्या खासदारांना आवाहन, म्हणाले...

Skin Care: तुम्ही त्वचेवर जास्त बॉडी लोशन लावता का? तर या समस्या होऊ शकतात

Maharashtra News Live Updates: विधानसभा निकालानंतर मनसेची चिंतन बैठक

Daulat Daroda News : शहापूर विधानसभेत पाचव्यांदा निवडून आलेल्या दौलत दरोडांनी व्यक्त केले आभार

Milind Gawali : अखेर प्रवास संपला! 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळींची भावुक पोस्ट, सेटवरील 'ही' गोष्ट घेऊन अनिरुद्ध पडला बाहेर

SCROLL FOR NEXT