Atal Setu Mumbai Trans Harbour Link  x
मुंबई/पुणे

No Toll Tax : अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल नाही, मुंबई-पुणे एक्सप्रेसवर काय स्थिती?

Atal Setu Mumbai Trans Harbour Link : आजपासून (शुक्रवारपासून) अटल सेतूवर इलेक्ट्रिक चारचाकी वाहनं आणि बसला टोल माफी लागू झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गावरही टोल माफी लागू होईल.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

  • अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून टोल माफी लागू.

  • पुढील दोन दिवसांत मुंबई-पुणे आणि समृद्धी महामार्गावरही टोल माफी होणार.

  • मालवाहू इलेक्ट्रिक वाहनांना सूट नाही.

  • पर्यावरणपूरक वाहने वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा उपक्रम.

Mumbai Atal Setu No Toll Tax : आजपासून अटल सेतूवरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना एक रूपयाही टोल घेतला जाणार नाही. २९ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने नवीन धोरण आणले होते, त्यानुसार राज्यातील प्रमुख महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोल करातून वगळण्यात आले होते. त्याची आजपासून अंबलबजावनी होत आहे. आजपासून अटल सेतूवरून जाणाऱ्या प्रत्येक इलेक्ट्रिक वाहनाला टोल माफ केला जाणार आहे. पुढील दोन दिवसांत मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्गावरही टोलमाफी केली जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील पाच वर्षांपर्यंत टोलमध्ये सूट देण्यात आली आहे. त्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरला तयार करण्यात आले आहे. सध्या अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी करण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मुंबई-पुणे आणि मुंबई-नागपूर या महामार्गावरही हा निर्णय घेतला जाणार आहे. (Atal Setu Mumbai Trans Harbour Link )

मुंबई आणि राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेटूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी आजपासून लागू करण्यात आली आहे. सरकारी आणि खासगी वाहनांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चारचाकी इलेक्ट्रिक गाड्या आणि बसेससाठी हा निर्णय असेल. अटल सेतूवर दररोज अंदाजे ६० हजार वाहने जातात. त्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्य सरकारने २०२३० पर्यंत राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. अटल सेतूवर चारचाकी वाहनाला २५० रूपयांचा टोल आहे, इलेक्टिक वाहनांना आता एक रूपायाही टोल द्यावा लागणार नाही.

फडणवीस सरकारने २९ एप्रिल २०२५ रोजी 'महाराष्ट्र विद्युत वाहन निती'ची घोषणा केली. त्याअंतर्गत अटल सेतू, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक चारचाकी वाहने आणि बसला १०० टक्के टोलमाफीचा निर्णय घेतला. तर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमध्ये ५० टक्के सूट मिळेल. परिवहन आयुक्त विवेक भिमनवर यांनी सांगितले की, 'अटल सेतूवर टोल माफीसाठी एक सॉफ्टवेयर तयार करण्यात आले आहे. शुक्रवारपासून ते सुरू करण्यात येणार आहे. अन्य दोन महामार्गावरही दोन दिवसांत ही सुविधा सुरू होणार आहे. '

मालवाहू वाहनांना सूट नाही

राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक धोरणानुसार, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना (ईव्ही) टोलमधून सूट देण्यात येणार आहे. पण इलेक्ट्रिक मालवाहक वाहनांचा समावेश नाही. ही सवलत सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी लागू करण्यात आली आहे. या नव्या नियमामुळे पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढण्याची आणि मुंबईतील वाहतूक क्षेत्रात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा आहे.

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, मुंबईत सध्या 22,400 इलेक्ट्रिक वाहने नोंदणीकृत आहेत. सरासरी दररोज सुमारे 60,000 वाहने अटल सेतुवरून प्रवास करतात. प्रदुषण रोखण्यासाठी एप्रिल महिन्यात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर करण्यात आलं होतं.. त्याची अंमलबजावणी कऱण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच, गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

Passenger Boat Accident: समुद्रात 10 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटीची धडक

Russia-Ukraine War: भारतच रशिया-युक्रेनमध्ये शांतता घडवणार? पुतीन-झेलेन्स्की भारतात येणार

Maratha Reservation: 'चलो मुंबई'! मनोज जरांगेंचा रोष नेमका कोणावर? आंदोलनाचा रोड मॅप नेमका कसा?

Sleep and Earn: झोपा आणि झोपण्याचे पैसे कमवा, 9 तास झोपा, 10 लाख मिळवा

SCROLL FOR NEXT