KDMC Budget,
KDMC Budget,  Saam Tv
मुंबई/पुणे

KDMC Budget : बिल्डर लाॅबीसह कल्याण डोंबिवलीकरांना माेठा दिलासा, अनधिकृत बांधकाम हाेणार अधिकृत; जाणून घ्या अर्थसंकल्प

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- अभिजीत देशमुख

kalyan dombivli municipal corporation budget news : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा २०२३-२४ चा २२०६.३० कोटींचा अर्थसंकल्प आज (गुरुवार) महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी सभागृहात सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांसह घनकचरा व्यवस्थापन, क्रीडा सुविधांवर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे अर्थसंकल्पात कोणतीही कर वाढ नसल्याने कल्याण डोंबिवलीकरांना माेठा दिलासा आहे.

शासकीय धोरणानुसार अनधिकृत बांधकाम दंडात्मक कारवाई करत अधिकृत करण्याबाबत तसेच जी बांधकामे नियमित होणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेत असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिली. तसेच पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील यंदाच्या या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. (Maharashtra News)

यंदाच्या अर्थसंकल्पात ६८ हेल्थ वेअरनेस सेंटर, नवीन प्रसुतीगृह व कॅन्सर सेंटर, कॅथलब, केमोथेरपी केंद्र, रेडीओथेर्पी केंद्र, नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय, पाळीव प्राण्याचा दवाखाना, अद्ययावत रोगनिदान केंद्र यासारख्या आरोग्य सुविधा बाह्य यंत्रणेकरवी सुरु करत शहरातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठीची तरतूद आयुक्तांनी केली आहे.

याचवेळी शहरातील स्वच्छतेवर विशेष भर देताना स्वच्छ भारत अभियानात आधारवाडी डम्पिंग ग्राउंड रिकामे करणे, कचर्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प कार्यान्वित करणे, कचरा प्रकल्प वाढवणे, मोबाईल टॉयलेट यासारख्या सुविधाचा अंतर्भाव अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.नागरिकांच्या आरोग्यासाठी क्रीडा सुविधांवर भर देण्यात आला.

शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न गाजत असतानाच शासकीय धोरणानुसार अनधिकृत बांधकाम दंडात्मक कारवाईने अधिकृत करण्याची मोहीम राबविली जाणार आहेत. शासकीय भूखंडावर नसलेल्या आणि नियमानुसार अधिकृत करता येणाऱ्या इमारती दंड भरून अधिकृत करून घेण्याची मोठी संधी या अर्थसंकल्पा दरम्यान आयुक्तांनी विकासकांना दिली आहे. यामुळे अनधिकृत बांधकामाच्या टांगत्या तलवारीसह जगणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Eknath Shinde: उद्धव ठाकरेंची आधीच विकेट गेलीय; संजय निरुपम यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

Cancer Health Tips: कर्करोग टाळाण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' छोटे बदल

Maharashtra Politics: राज्यात एक मंत्रिपद आणि विधानसभा निवडणुकीत RPI ला 10 जागा मिळणार: रामदार आठवले

Vastu Tips: या दिवशी झाडू खरेदी करा, गरीबी होईल दूर

Today's Marathi News Live : ​10 जूनपर्यंत वाघनखा महाराष्ट्रात येण्याची शक्यता, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

SCROLL FOR NEXT