मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुढची ५ वर्षे टोलवाढ नाही, कारण काय ? Google
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुढची ५ वर्षे टोलवाढ नाही, कारण काय ?

No Toll Hike: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २०३० पर्यंत टोलवाढ होणार नाही, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. यामुळे प्रवाशांना काही वर्षे टोल शुल्कात वाढीचा सामना करावा लागणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारित असलेल्या टोल नाक्यांवरील टोलदर यंदा वाढले असले तरी, हा मार्ग 'एमएसआरडीसी'च्या अखत्यारित असल्याने येथे टोलवाढ होणार नाही.

'एमएसआरडीसी'च्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, आता पुढील टोलवाढ ३० एप्रिल २०३० पर्यंत होणार नाही. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना स्थिर टोलदराचा फायदा होणार आहे.

एक्सप्रेस वेवरील टोल दर दरवर्षी 6% वाढवण्याचा नियम असला तरी व्यवहार्यता आणि तांत्रिक कारणांमुळे प्रतिवर्षी वाढ न करता ती तीन वर्षांनी एकत्रितपणे 18% लागू केली जाते, ज्यामुळे वारंवार दर बदलण्याची आवश्यकता टाळली जाते आणि टोल वसुली व्यवस्थापन सोपे होते.

१ एप्रिल २०२३ रोजी या द्रुतगती मार्गावर अखेरची टोलवाढ करण्यात आली होती. आता ३० एप्रिल २०३० पर्यंत या रस्त्यावर कोणत्याही प्रकारची टोलवाढ होणार नाही, असे राज्य रस्ते विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Dosh: मंगळमुळे लग्न जमेना! 'या'५ खात्रीशीर उपायांनी दूर होईल मंगळदोष

Parbhani: हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, ५ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Masoor Bhaat Recipe: लहान मुलांना डब्ब्यात द्या पौष्टिक आणि चविष्ट मसूर भात, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट,डोंबिवलीत मनसे आक्रमक, तरुणावर कारवाई

चंद्रपूर गुदमरलं! साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT