Raigad News Saam Tv
मुंबई/पुणे

अनंत गितेंचे शिवसेनेला विस्मरण; आदित्य ठाकरेंच्या स्वागताच्या बॅनरवरून गितेंचे छबी गायब

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - रायगडचे दोन वेळा आणि रत्नागिरी जिल्ह्याचे चार वेळा खासदार राहिलेले अनंत गीते (Anant Gite) हे आता शिवसेनेच्या विस्मरणात जाऊ लागल्याचे चित्र रायगडात (Raigad) तयार झाले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे 30 मार्च रोजी रायगड दौऱ्यावर येत आहेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या स्वागताचे बॅनर जिल्ह्यात शिवसेनेकडून (Shivsena) लावण्यात आले आहेत. मात्र शिवसेनेचे नेते असलेले माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे फोटो बॅनर वरून गायब झाल्याने ते शिवसैनिकांच्या विस्मरणात गेले असल्याचे चित्र तयार झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

हे देखील पहा -

शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे उद्या 30 मार्च रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. रायगड जिल्ह्यातील विकासकामाचे भूमिपूजन आणि शिवसैनिकाशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे हे येत आहेत. 30 मार्च रोजी लोणारे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यपीठाच्या वसतिगृह कामाचे भूमिपूजन तर दुपारी माणगाव येथे मेळावा संपन्न होणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे येत असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. मेळाव्याची जय्यत तयारीही सुरू आहे. आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे आणि मेळाव्याचे बॅनर जिल्हाभर लावण्यात आले आहेत.

जिल्ह्यात लागलेल्या बॅनरवर उद्योग मंत्री सुभाष देसाई, तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत, उपनेते विनोद घोसाळकर यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना आमदार, पदाधिकारी यांची छबी झळकली आहे. मात्र सहा वेळा खासदार राहिलेल्या माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना कटाक्षाने बॅनरमध्ये स्थान देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसत आहे. बॅनरवरील मजकूर हा वरिष्ठ पातळीवरून आल्याने त्यात गीतेचा फोटो घेतलेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेत अनंत गीतेचे स्थान डळमळीत झाल्याचे या प्रकारावरून दिसत आहे.

अनंत गीते हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले. यामुळे गीते हे पक्षनेतृत्वावर नाराज होते. माणगाव मेळाव्यातही गीते यांनी आपला संताप व्यक्त केला होता. अनंत गीते यांचे आजही रायगडात स्वतःचे स्थान आहे. त्यांना मानणारा वर्ग आजही आहे. त्यामुळे अनंत गीते यांना डावलणे हे पक्षाला भविष्यात घातक ठरणार हे मात्र नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT