Maharashtra Political News Updates Uddhav Thackeray On CM EknathShinde Saam TV
मुंबई/पुणे

धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावू शकत नाही - उद्धव ठाकरे

मागील अनेक दिवसांपासून शिंदे गट आपली शिवसेना हिच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहे.

Jagdish Patil

मुंबई: आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवरुन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हा आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नसल्याचं स्पष्ट केलं. मागील अनेक दिवसांपासून शिंदे गट आपली शिवसेना (Shivsena) हिच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहे.

त्यामुळे शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाकडे जाणार शिंदे गटाकडे की, ते उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात होते. या सर्व चर्चांना उत्तर देण्यासाठी आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांचे स्वागत करत बोलण्यास सुरुवात केली ते म्हणले, 'सध्या शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. मात्र शिवसेनेपासून धणुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे मी माझ्या मनाचं सांगत नसून कायदेतज्ञ, घटनात्मक अभ्यासकांशी बोलून तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे नवीन चिन्हाचा विचार करण्याची गरज आपणाला नाही. कारण शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही वेगळा करुन शकत नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ -

तसंच यावेळी ठाकरे म्हणाले, 'मला पंढरपूरला (Pandharpur) येण्यासाठी अनेक वारकऱ्यांचे निरोप येत आहेत. पण मी सध्या विठूमाऊलींच्या दर्शनाला येणार नाही. मात्र, काही दिवसांमध्ये दर्शनासाठी जाणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या नगरसेवकांवर देखील निशाणा साधला.

ठाकरे म्हणाले, 'सध्या काही फोटो फिरत आहेत की नगरसेवक बाहेर पडले पण सध्या महापालिका, नगरपालिकाच अस्तिवातच नाहीत. त्यामुळे जे बाहेर गेलेत ते त्यांचे वैयक्तिक कार्यकर्ते असू शकतात, त्यांच्या आग्रहामुळे, शिफारशीने मी निष्ठावान शिवसैनिकांना सोडून ज्यांना तिकीट दिलं तेच लोक शिवसेनेतून बाहेर पडले असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, आज बोलताना उद्धव ठाकरे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं ते म्हणाले, 'मागिल अनेक दिवसांपासून मातोश्रीवरती अनेक शिवसैनिक येत आहेत. त्या सर्वांशी बोलतोय, सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. मला देखील दु:ख होतय मात्र, शिवसेना प्रमुखांच एक वाक्य महत्वाचं आहे, ते म्हणायचे, माशाच्या डोळ्यातील अश्रू कोणाला दिसत नाहीत, मलाही दु:ख आहे भावना आहेत पण मीच दडपणात येऊन चालणार नाही. शिवसैनिकांचं दडपण घालवण्याचं काम माझं आहे.'

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, त्याच सूटमध्ये २४ तास आधीही रंगली होती पार्टी

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

नवऱ्याला रेव्ह पार्टीत बेड्या, २४ तासानंतर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया, दोन ओळीत विषय संपवला

गेट ओलांडून घरात गेली अन् क्षणातच भिंत कोसळली; महिला थोडक्यात बचावली; VIDEO

IB Recruitment: १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी; इंटेलिजेंस ब्युरोमध्ये भरती; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT