Devendra Fadnavis / Uddhav Thackeray
Devendra Fadnavis / Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

आता पर्सनल अटॅक नको; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे निरोप

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आता पर्सनल अटॅक नको; असा निरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आता सावध भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.

राज्यात विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने कंबर कसली असतानाच आता राजकीय क्षेत्रातून एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. सतत एकमेंकावर, त्यांच्या घरच्यांवर राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करत असतात. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता एकमेकांवरती वैयक्तिक पातळीवर हल्ले नकोत, असा निरोप उद्धव ठाकरेंना दिला असल्याची माहिती समोर येत आहे. (Vidhan Parishad Election)

हे देखील पाहा -

त्यामुळेच की काय, एकनाथ शिंदे आणि CM उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यातील मतभेदाची उघडपणे चर्चा सुरु झाल्या आहेत, शिवाय दुसरीकडे आमदारांमध्येही नेतृत्त्वाबाबत नाराजी असल्याचं बोललं जात होतं.मात्र, फडणवीस यांनी शिवसेनेच्या (Shivsena) अंतर्गत मतभेदाच्या प्रश्नावर फडणवीसांनी बोलणं टाळलं आहे.

फडणवीस यांनी पाठवलेल्या निरोपानंतर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. कारण आतापर्यंत फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी तसंच नातेवाईकांवर केलेल्या आरोपांचं काय? शिवसेनेच्या नेत्यांना बदनाम केलं त्याचं काय? असा सवाल सेना नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhya Pradesh Election: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'या' चार जिल्ह्यांत फेरमतदान होणार

Horoscope: लग्नाचा योग, व्यवसायात यश; तुमच्या राशीत काय?

Todays Horoscope: व्यवहारात सतर्कता, जोडीदारासोबत प्रेमाने वागा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय?

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

SCROLL FOR NEXT