Hindustani Bhau's Advocate's Advice To Students Saam Tv
मुंबई/पुणे

Hindustani Bhau बाहेर येईपर्यंत कोणतंही पाऊल उचलू नये - वकील अशोक मुळे यांचं विद्यार्थ्यांना आवाहन

Hindustani Bhau: आज दुपारी 12 वाजता धारावी पोलीस ठाण्याबाहेर (Dharavi Police Station) विद्यार्थ्यांनी जमा होण्याचे आवाहन करणारी ऑडिओ क्लिप समोर आली आहे.

सुरज सावंत

मुंबई: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी (Student Protest ) भडकवल्या प्रकरणी हिंदुस्थानी भाऊवर (Hindustani Bhau) मोठी कारवाई करत मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. या घटनेप्रकरणी हिंदुस्थानी भाऊंना चार दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली होती. आता हिंदुस्थानी भाऊच्या (Hindustani Bhau) अटकेनंतर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. "विद्यार्थ्यांसाठी भाऊंना अटक झाली, आता आपण विद्यार्थ्यांनी पुढे येऊन त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे" अशा परिस्थितीत आज दुपारी 12 वाजता धारावी पोलीस ठाण्याबाहेर (Dharavi Police Station) विद्यार्थ्यांनी जमा होण्याचे आवाहन करणारी ऑडिओ क्लिप समोर आली आहे. (No action should be taken till Hindustani Bhau comes out - Advocate Ashok Mule appeals to students)

हे देखील पहा -

याप्रकरणी हिंंदुस्तानी भाऊंच्या वतीने त्यांचे वकील अशोक मुळे यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, भाऊंसाठी आपण एकत्र या, असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलेले नाही. काही समाजकंटक त्यांच्या (हिंदुस्थानी भाऊंच्या) नावाने हे करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हिंदुस्थानी भाऊ बाहेर येईपर्यंत कोणतेही पाऊल उचलू नये असं आवाहन हिंदुस्थानी भाऊच्या वकीलांनी केलं आहे.

सोमवारी राज्यभरात दहावी-बारावीच्या परिक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या, या मागणीसाठी लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर विकास पाठक आणि इकरार खान वखार खान यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर दोघांना धारावी पोलिसांनी अटक केली होती. काल म्हणजेच सोमवारी मुंबईतील धारावीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. कोरोनाच्या संकटात 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑनलाइन कराव्यात, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. ऑफलाइन परीक्षा घेण्यास विद्यार्थयांचा विरोध आहे. दरम्यान, विकास पाठक याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

SCROLL FOR NEXT