Uran Accident Saam Digital
मुंबई/पुणे

Uran Accident: उरणमध्ये NMMT बसने चार जणांना उडवलं, एका तरुणाचा मृत्यू, घटना CCTV त कैद

Uran Accident News: उरण तालुक्यातील खोपटेनजीक एनएमएमटी बसने चार जणांना उडवले असून या भीषण अपघातात निलेश शशिकांत म्हात्रे या 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय.

Sandeep Gawade

Uran Accident

उरण तालुक्यातील खोपटेनजीक एनएमएमटी बसने चार जणांना उडवले असून या भीषण अपघातात निलेश शशिकांत म्हात्रे या 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. एनएमएमटीची 34 नंबरची बस उरणला जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने तीन दुचाकी आणि टेम्पोला बसने जोरदार धडक दिली. याबाबत नवी मुंबई एनएमएमटी प्रशासन अधिक चौकशी करत असल्याची माहिती अधिकारी योगेश कडूस्कर यांनी दिली. या घटनेचा cctv समोर आला असून अपघातापूर्वी प्रसंगावधान साधत टेम्पोतून दोघांनी उडी घेतल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

पतंग उडवताना गच्चीवरून पडून मुलाचा मृत्यू

मिरा रोड पूर्व पूजानगर परिसरात मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गच्चीवर पतंग पकडण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा तोल जाऊन इमारतीवरून खाली पडून मृत्यू झाला आहे. हमजा मुस्ताक कुरेशी असे मयत मुलाचे नाव आहे. घटनेपूर्वी काही तास आधी सीसीटीव्हीमध्ये तो सोसायटीच्या मुलांच्या सोबत सायकल चालवताना दिसत आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परीक्षेला जाताना डंपरने चिरडलं

छत्रपती संभाजीनगरमधून एका मोठ्या अपघाताची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजी नगर शहरातील बाळापूर फाट्यावर हायवा आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तिघा भाऊ- बहिणींचा जागीच मृत्यू झाला. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृतांची नावे आहेत. ते वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील होते. मृतांजवळ वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट सापडले. यावरून ते परीक्षा देण्यासाठी जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :अण्णा बनसोडे 4300 मतांनी आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT