Animal Lover News: प्राणी मित्रांसाठी खूशखबर! मार्चमध्ये सुरू होणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, या उद्योगतीचं स्वप्न सत्यात उतरणार

Animal Lover News: पाळीव प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या नागरिकांसाठी खूशखबर असून पहिले अत्याधुनिक प्राणी रुग्णालय मार्चमध्ये सेवेत दाखल होणार आहे. उद्योगपती रतन टाटा यांच्या स्वप्नातील हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे.
Animal Lover News
Animal Lover NewsSaam Digital
Published On

Animal Lover News

पाळीव प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या नागरिकांसाठी खूशखबर असून पहिले अत्याधुनिक प्राणी रुग्णालय मार्चमध्ये सेवेत दाखल होणार आहे. उद्योगपती रतन टाटा यांच्या स्वप्नातील हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय महालक्ष्मी परिसरात ९८ हजार चौरस फूट जागेवर उभारण्यात आले आहे. टाटा ट्रस्टने बांधलेल्या पाच मजली इमारतीत २०० खाटांचे हे रुग्णालय आहे. या रुग्णालयाची सेवा २४ तास सुरू असणार असून यात पशुवैद्यक, प्रशिक्षित परिचारिका आणि तंत्रज्ञ आरोग्य सेवा देणार आहेत.

रुग्णालयात टप्प्याटप्प्याने प्राण्यांसाठी व्यापक, आधुनिक सुविधा दिल्या जाणार असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे. मुंबईतील भटक्या कुत्र्यांवर येथे उपचार होतील. टाटा ट्रस्टच्या मानवतावादी आणि सामाजिक सेवेच्या धोरणानुसार या रुग्णालयाची निर्मिती केली आहे. लंडनचे प्रतिष्ठित रॉयल पशुवैद्यक कॉलेज या प्रकल्पात नॉलेज पार्टनर आहे. प्रख्यात आणि अनुभवी डॉ. थॉमस हीथकॉट यांच्या नेतृत्वाखाली ६६ कुशल डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि पाळीव प्राण्यांची काळजी घेणारे सहायक दिवसरात्र सेवेत असणार आहेत. देशातील पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात जी कमतरता आहे, ती भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही करू. तसेच लवकरच प्राणीप्रेमींसाठी एक उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून रुग्णालय नावारूपास येईल, असा आशावाद टाटा ट्रस्टने व्यक्त केला.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Animal Lover News
Electric Vehicle News : विजेवरील वाहनांना महाराष्ट्राची ‘पॉवर’; राज्यात सर्वाधिक ३२१६ EV चार्जिंग स्टेशन

जेव्हा मी आजूबाजूला बघतो, तेव्हा मला देशात पाळीव प्राण्यांसाठी पायाभूत सुविधांची कमतरता दिसली. पाळीव प्राण्यांची लक्षणीय संख्या असलेल्या आपल्या देशात प्राण्यांचे जीव वाचवू शकेल आणि त्याचे जीवन अधिक चांगले बनवू शकेल, अशा सुविधा का उपलब्ध नाहीत. मानवी दृष्‍टिकोनातून प्रत्येक पाळीव प्राण्यांची काळजी घेणे, आरोग्य उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे हे रुग्णालय उभारणीमागचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

- रतन टाटा, संचालक, टाटा ट्रस्ट

अत्याधुनिक सुविधा

- प्रयोगशाळा

- चार शस्त्रक्रिया गृह

- अतिदक्षता विभाग

- रिकव्हरी रूम, आपत्कालीन कक्ष

- एमआरआर, एक्सरे मशीन क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅब

Animal Lover News
Maharashtra Budget 2024 Date: अर्थसंकल्पीय‌ अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून; अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीला मांडणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com